सुप्रीम कॉलनी, साहित्या नगर, अमित कॉलनीत प्रचार फेरी
जळगाव (प्रतिनिधी) : आ. राजूमामा भोळेंना शनिवारी दि. १६ रोजी पहिल्या टप्प्यातील प्रचारात तरुणाईकडून जोरदार स्वागत झाले. काहींनी तर चक्क जेसीबीतून पुष्पवृष्टी केली. तरुणांचा मोठा उत्साह पाहून आ. राजूमामा भोळे यांनी आभार मानले.
सुप्रीम कॉलनी येथील शिवरुद्र महादेव मंदिर येथे पूजा करून आ. राजूमामा भोळे व माजी महापौर सीमा भोळे यांनी दिवसातील प्रचाराच्या पहिल्या टप्प्यातील रॅलीला सुरुवात केली. सुप्रीम कॉलनी, पोलीस कॉलनी, महादेव मंदिर परिसर, सेवालाल चौक, साहित्या नगर, अमित कॉलनी मार्गे रामदेव बाबा मंदिर येथे रॅलीचा समारोप करण्यात आला. सुप्रीम कॉलनीत तरुणांनी मोठ्या संख्येने रॅलीत सहभागी होत आ. राजूमामा भोळे यांच्या पाठीशी राहण्याचे नागरिकांना आवाहन केले. माजी महापौर सीमाताई भोळे यांनी सुरुवातीला नागरिकांच्या भेटीगाठी घेऊन महायुतीच्या पाठीशी राहण्याचे आवाहन केले. नागरिकांनी घराच्या गच्चीवरून फुलांचा वर्षाव करीत स्वागत केले. तर महिला भगिनींनी औंक्षण करून विजयाच्या शुभेच्छा दिल्या.
रॅलीत भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष उज्वलाताई बेंडाळे, जिल्हा उपाध्यक्ष नितीन इंगळे, शिवसेनेचे माजी नगरसेवक गणेश सोनवणे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार गटाचे प्रदेश संघटक विनोद देशमुख, राष्ट्रवादीचे विधानसभा क्षेत्र प्रमुख फिरोज शेख, लोक जनशक्ती पक्षाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष दीपक सपकाळे, जिल्हाध्यक्ष अशोक पारधे, पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजूभाई मोरे, रिपाई (आठवले) गटाचे महानगराध्यक्ष अनिल अडकमोल, माजी नगरसेवक भारती सोनवणे, भाजप मंडळ क्रमांक ३ चे अध्यक्ष सुनील सरोदे, सरचिटणीस किसन मराठे, विठ्ठल पाटील, भाजप अल्पसंख्याक महानगराध्यक्ष अशफाक खाटीक, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महिला महानगराध्यक्ष मीनल पाटील, भाजपचे ललित चौधरी, प्रदीप रोटे, विजय वानखेडे, संजय घुगे, आबा सोनवणे, तुषार पाचपांडे, अक्षय जेजूरकर, जितेंद्र चौथे, आप्पा खडके, योगेश निंबाळकर, लखन वंजारी, प्रसाद चव्हाण, नितीन चव्हाण, गोपाळ राठोड, दीप्ती चिरमाडे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अर्चना कदम, ममता तडवी, शोभा भोईटे, फैजान पटेल, रिपाई (आठवले) गटाचे युवा जिल्हाध्यक्ष मिलिंद सोनवणे, अविनाश पारधे, मिलिंद सोनवणे, प्रताप बनसोडे, नाना भालेराव, अक्षय मेघे, लोक जनशक्ती पक्षाचे मनोज निकम, आनंदा सोनवणे आदी महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.