जळगाव ( प्रतिनिधी ) – जळगाव तालुक्यातील आसोदा येथे लहान मुलांच्या भांडणाच्या कारणावरून २८ वर्षीय विवाहितेला दोन जणांनी विळा मारून गंभीर दुखापत केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी रविवारी जळगाव तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव तालुक्यातील आसोदा गावात कविता रविंद्र कोळी या महिला आपल्या परिवारासह राहायला आहे. रविवारी २ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता लहान मुलांच्या भांडणाच्या कारणावरून शेजारी राहणारे मंगला विलास सोनवणे आणि विलास सोनवणे या दोघांनी शिवीगाळ केली. यात मंगला सोनवणे या महिलेने विवाहितेच्या मांडीला विळा मारून गंभीर जखमी केले. तर विलास सोनवणे याने काठी मारून डोक्याला दुखापत केली. हा प्रकार घडल्यानंतर विवाहितेने जळगाव तालुका पोलीस स्टेशनला दोघांविरोधात तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून रविवारी २ मार्च रोजी दुपारी ४ वाजता मंगला विलास सोनवणे आणि विलास सोनवणे या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आले आहे.