नारी शक्तीला भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशनचे प्रोत्साहन
जळगाव (प्रतिनिधी) – भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशनतर्फे आयोजित तरूणींसाठी दहीहंडी उत्सवात एनसीसी, नुतन मराठा महाविद्यालय, विद्या इंग्लीश स्कूल यांना दहीहंडी फोडण्याचा मान मिळाला. यात एनसीसी, नुतन मराठा महाविद्यालय यांनी दहिहंडी फोडली.
काव्यरत्नावली चौकातील तरूणींची दहीहंडी प्रसंगी प्रमुख पाहूणे म्हणून जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. चे सहव्यवस्थापकीय संचालक अतुल जैन, पोलीस अधिक्षक मेघनाथन राजकुमार, आमदार सुरेश भोळे, महापौर जयश्री महाजन, एनसीसीचे कमांडींग ऑफिसर कर्नल अभिजित महाजन, लेफ्टनंट कर्नल पवन कुमार,अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी, उपविभागीय पोलीस अधिकारी संदिप गावित, प्र.डीवायएसपी सतिष कुलकर्णी, शिवसेना सहसंपर्क प्रमुख संजय सावंत, विकास पवार, जैन इरिगेशनचे अनिल जोशी उपस्थित होते. विवेकानंद व्यायाम शाळेतर्फे मर्दानी खेळाचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. यासह शिवतांडव व शोर्यवीर या दोन्ही ढोलताशा पथकातील सुमारे २७५ ढोलताशा वादकांनी आपल्या कलाकृती सादर केली. मल्लखांब प्रशिक्षक नरेंद्र भोई यांच्या मार्गदर्शनात २० विद्यार्थ्यांनी रोप मल्लखांब, पोल मल्लखांब चे चित्तथरारक सादरीकरण करून जळगावकरांची मने जिंकली. ५ ते १२ वर्ष वयोगटातील बाळगोपाळांसाठी राधा-श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये विद्यार्थ्यांचा उत्फूर्त सहभाग होता.
चांद्रयान-3 यशस्वी झाले. त्यात महिलांचे योगदान महत्त्वाचे होते. इस्रोच्या महिला शास्त्रज्ञ डाॕ. रितु श्रीवास्तव, नंदिनी हरिनाथ, अनुराधा टि. के., मिनल रोहित, मऊ मिता दत्त, टेसी थाॕमल्स, व्हि. आर. लली थांबिका, मुथ्या विनिथा यांच्या सन्मानार्थ ‘त्या नाहितर कोण..’ ही थिम घेऊन दहीहंडीत विशेष मानाचे स्थान देण्यात आले होते. चंद्राची प्रतीकृती साकारून महिलां शास्त्रज्ञाचे प्रेरणादायी छायाचित्रे सिता-यांमध्ये दाखविण्यात आले होते.