• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

महावितरणचा मानव संसाधन विभाग सॅप-ईआरपी प्रणालीमुळे झाला हायटेक

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 8, 2021
in जळगाव, महाराष्ट्र
0


जळगाव/धुळे/नंदुरबार ;- वीजग्राहकांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ग्राहकसेवा देणाऱ्या महावितरणने मानव संसाधन विभागाचे कामकाज सॅप-ईआरपी प्रणालीद्वारे नुकतेच सुरू केले आहे. त्यामुळे सुमारे ५४ हजार कर्मचाऱ्यांसाठी कार्यरत सर्वच २२५ कार्यालयांमधील मानव संसाधन विभागाचे कामकाज या प्रणालीमुळे ऑनलाईन, जलद, अचूक व मानवी हस्तक्षेपरहित झाले आहे.
यापूर्वी महावितरणच्या मानव संसाधन विभागामध्ये मानव संसाधन व्यवस्थापन प्रणालीद्वारे (एचआरएमएस) कामकाज सुरू करण्यात आले होते. यामध्येही मानव संसाधन विभागाचे कामकाज वेगवान झाले. त्याहीपेक्षा अधिक वेगवान व बिनचूक असलेली सॅप-ईआरपी प्रणाली लागू करण्याचा महावितरण व्यवस्थापनाने निर्णय घेतला. पहिल्या टप्प्यात ही प्रणाली लेखा विभागासाठी सुरू करण्यात आली व त्याची अंमलबजावणी यशस्वीपणे सुरू झाली. त्यानंतर मानव संसाधन विभागासाठी सॅप-ईआरपी सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. विजय सिंघल यांनी विशेष लक्ष घालून वेग दिला.
महावितरणच्या मुख्यालयातील महाव्यवस्थापक (मानव संसाधन) राजेंद्र पांडे, महाव्यवस्थापक (माहिती तंत्रज्ञान) राजेश भालेकर व उपमहाव्यवस्थापक सुजाता देसाई व सहकाऱ्यांनी राज्यातील प्रादेशिक कार्यालय, परिमंडल, मंडल व विभाग अशा एकूण २२५ कार्यालयांतील मानव संसाधन विभागाचे कामकाज सॅप-ईआरपी प्रणालीद्वारे सुरू करण्यासाठी विशेष प्रयत्न केले. ही प्रणाली लागू करण्यापूर्वी महावितरणचे विविध नियम तसेच नियमावलीसोबतच मानव संसाधन विभागाशी निगडित संस्था व्यवस्थापन, वैयक्तिक प्रशासन, नूतनीकरण, वेळव्यवस्थापन, पे-रोल, उच्चवेतनश्रेणी लाभ, प्रशिक्षण, परीक्षा, तपास, बदली, शिस्तभंग कारवाई, गोपनीय अहवाल, अपघात व्यवस्थापन, मालमत्ता व्यवस्थापन, न्यायप्रविष्ट प्रकरणे, सतर्कता, श्रम आणि औद्योगिक संबंध यासारख्या प्रक्रिया अनेक प्रशिक्षण तसेच व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून जाणून घेण्यात आल्या.
महावितरणच्या मानव संसाधनमधील सॅप-ईआरपीची अंमलबजावणी महावितरणच्या सर्व कर्मचाऱ्यांच्या माहे मे महिन्याच्या वेतनाची प्रक्रिया पूर्ण करून सुरू झाली आहे. सॅप-ईआरपी प्रणाली वेगवान व अचूक आहे. सोबतच प्रत्येक क्रिया एकाधिक प्रभाव देत असल्याने एकाधिक नोंदीची कामे टाळली जाणे शक्य आहे. सॅप-ईआरपीमध्ये प्रत्येक क्रिया स्वयंचलितपणे असल्याने कर्मचाऱ्यांना त्यांचे दावे वेळेवर मिळणार आहेत. या प्रणालीत मानवी हस्तक्षेप पूर्णपणे टाळण्यात येतो. त्यामुळे महावितरणच्या सर्व कर्मचाऱ्यांना सॅप-ईआरपी प्रणालीद्वारे आता वेतन,भत्ते व इतर अनुषंगिक फायदे यासारख्या सेवा जलद मिळणार आहेत.


 

 

Previous Post

महात्मा गांधींच्या पणतीला दक्षिण आफ्रिकेत ७ वर्षांच्या तुरूंगवासाची शिक्षा

Next Post

धनराज पाटील यांची युवासेना जळगाव तालुका प्रमुखपदी निवड

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

धनराज पाटील यांची युवासेना जळगाव तालुका प्रमुखपदी निवड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उत्राणमध्ये महसूल विभागाचा धडाकेबाज प्रहार; अवैध वाळूचे तराफे जाळून केले नष्ट
1xbet russia

उत्राणमध्ये महसूल विभागाचा धडाकेबाज प्रहार; अवैध वाळूचे तराफे जाळून केले नष्ट

July 11, 2026
भुसावळात रिक्षाचालकाची गळफास घेऊन आत्महत्या  भुसावळ |
1xbet russia

भुसावळात रिक्षाचालकाची गळफास घेऊन आत्महत्या भुसावळ |

July 11, 2026
दापोरी बु. येथे कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या
1xbet russia

अकुलखेडा येथे ३५ वर्षीय व्यक्तीची गळफास घेऊन आत्महत्या

July 11, 2026
डॉक्टरांकडे घरफोडी, ६२ हजारांचा ऐवज लांबविला
1xbet russia

नशिराबादमध्ये मध्यरात्री धाडसी घरफोडी; झोपेत असलेल्या मायलेकांच्या घरातून ६० हजारांचा ऐवज लंपास

July 11, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

उत्राणमध्ये महसूल विभागाचा धडाकेबाज प्रहार; अवैध वाळूचे तराफे जाळून केले नष्ट

उत्राणमध्ये महसूल विभागाचा धडाकेबाज प्रहार; अवैध वाळूचे तराफे जाळून केले नष्ट

July 11, 2026
भुसावळात रिक्षाचालकाची गळफास घेऊन आत्महत्या  भुसावळ |

भुसावळात रिक्षाचालकाची गळफास घेऊन आत्महत्या भुसावळ |

July 11, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon