• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

महाराष्ट्र शासनाचे  ९, ११, १६ व २५  वर्षे मुदतीचे रोखे विक्रीस

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 17, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
जळगाव : विभागीय सहसंचालक पद तात्काळ नियमित नियुक्त करा

राज्य वित्त विभागाचे सचिवांची माहिती  

मुंबई (प्रतिनिधी) : महाराष्ट्र शासनाच्या ९, ११, १६ व २५ वर्षे मुदतीच्या रोख्यांची विक्री शासनाच्या सुधारित अधिसूचनेतील अटी आणि शर्तींच्या अधीन राहून करण्यात येईल. ९ व २५ वर्षे मुदतीच्या प्रत्येकी १,००० कोटींच्या रोख्यांची आणि ११ व १६ वर्षे मुदतीच्या प्रत्येकी १,५०० कोटींच्या रोख्यांची विक्री करण्यात येईल. या कर्जाद्वारे मिळालेल्या रकमेचा विनियोग शासनाच्या विकास कामासाठी अर्थपुरवठा करण्यासाठी केला जाईल, अशी माहिती वित्त विभागाच्या सचिव शैला ए. यांनी प्रत्येक रोख्यासाठी स्वतंत्र पत्रकान्वये दिली आहे.

अस्पर्धात्मक लिलाव पद्धतीनुसार (सुधारित) एकूण अधिसूचित केलेल्या शासन कर्जरोखे रकमेच्या १० टक्के रक्कम पात्र वैयक्तिक व संस्थात्मक गुंतवणुकदारांना वाटप करण्यात येईल. मात्र एका गुंतवणुकदारास एकूण अधिसूचित रकमेच्या जास्तीत जास्त एक टक्का रकमेच्या मर्यादेपर्यंत वाटप करण्यात येईल.दि. २० ऑक्टोबर, २०२५ रोजी भारतीय रिझर्व्ह बँकेतर्फे मुंबई फोर्ट येथील कार्यालयात लिलाव केला जाईल. तर लिलावाच्या बोली २० ऑक्टोबर, २०२५ रोजी संगणकीय प्रणालीनुसार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, कोअर बँकिंग सोल्यूशन, (ई-कुबेर) सिस्टीमनुसार सादर करावयाच्या आहेत.

यामध्ये स्पर्धात्मक बोली संगणकीय प्रणालीद्वारे ई-कुबेर सिस्टीमनुसार सकाळी १०.३० ते ११.३० वाजेपर्यंत सादर कराव्यात. तर अस्पर्धात्मक बोली ई-कुबेर सिस्टिमनुसार सकाळी १०.३० ते ११.०० पर्यंत सादर कराव्यात. लिलावाचा निकाल त्याच दिवशी भारतीय रिझर्व्ह बँकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. यशस्वी झालेल्या बोलीदारांकडून रकमेचे प्रदान २३ ऑक्टोबर, २०२५ रोजी रोखीने, बँकर्स धनादेश/प्रदान आदेश, डिमांड ड्राफ्ट किंवा त्यांच्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, मुंबई येथील खात्यात देय असलेले धनादेश बँकेची कामकाजाची वेळ संपण्यापूर्वी अधिदानाने प्रदान करण्यात येतील.

९ वर्ष कालावधीच्या कर्जरोख्यांचा कालावधी १० सप्टेंबर, २०२५ पासून सुरू होईल. कर्जरोख्याची परतफेड दिनांक १० सप्टेंबर, २०३४ रोजी पूर्ण किमतीने केली जाईल. तर कर्जरोख्याचा व्याजाचा दर हा दरसाल दर शेकडा ७.२४ टक्के दराएवढा असेल. व्याजाचे प्रदान प्रतिवर्षी दिनांक मार्च १० आणि सप्टेंबर १० रोजी सहामाही पद्धतीने करण्यात येईल. ११ वर्ष कालावधीच्या कर्जरोख्यांचा कालावधी २३ ऑक्टोबर, २०२५ पासून सुरू होईल. कर्जरोख्याची परतफेड दिनांक २३ ऑक्टोबर, २०३६ रोजी पूर्ण किमतीने केली जाईल. तर कर्जरोख्याचा व्याजाचा दर हा दरसाल दर शेकडा कूपन दराएवढा असेल. व्याजाचे प्रदान प्रतिवर्षी दिनांक एप्रिल २३ आणि ऑक्टोबर २३ रोजी सहामाही पद्धतीने करण्यात येईल.

१६ वर्ष कालावधीच्या कर्जरोख्यांचा कालावधी ८ ऑक्टोबर, २०२५ पासून सुरू होईल. कर्जरोख्याची परतफेड दिनांक ८ ऑक्टोबर, २०४१ रोजी पूर्ण किमतीने केली जाईल. तर कर्जरोख्याचा व्याजाचा दर हा दरसाल दर शेकडा ७.२६ टक्के दराएवढा असेल. व्याजाचे प्रदान प्रतिवर्षी दिनांक एप्रिल ८ आणि ऑक्टोबर ८ रोजी सहामाही पद्धतीने करण्यात येईल.२५ वर्ष कालावधीच्या कर्जरोख्यांचा कालावधी २३ ऑक्टोबर, २०२५ पासून सुरू होईल. कर्जरोख्याची परतफेड दिनांक २३ ऑक्टोबर, २०५० रोजी पूर्ण किमतीने केली जाईल. तर कर्जरोख्याचा व्याजाचा दर हा दरसाल दर शेकडा कूपन दरा एवढा असेल. व्याजाचे प्रदान प्रतिवर्षी दिनांक एप्रिल २३ आणि ऑक्टोबर २३ रोजी सहामाही पद्धतीने करण्यात येईल. शासकीय रोख्यांमधील बँकांची गुंतवणूक ही बँकिंग विनियम अधिनियम, १९४९ खालील कलम २४ अंतर्गत सांविधिक रोकड सुलभता गुणोत्तर या प्रयोजनार्थ पात्र समजण्यात येईल. हे कर्जरोखे पुन: विक्री-खरेदीसाठी अनुज्ञेय असतील, अशी माहिती वित्त विभागाने दिली आहे.


 

 

Tags: maharashtra-shasan-rokhe-vikri news
Previous Post

अभिनव : भेटण्यासाठी या, पण पुष्पगुच्छ ऐवजी वैचारिक पुस्तके भेट द्या !

Next Post

धावत्या रेल्वेच्या धक्क्याने प्रौढाचा जागीच मृत्यू,  म्हसावदला शोककळा

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
धावत्या रेल्वेच्या धक्क्याने प्रौढाचा जागीच मृत्यू,  म्हसावदला शोककळा

धावत्या रेल्वेच्या धक्क्याने प्रौढाचा जागीच मृत्यू,  म्हसावदला शोककळा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महापौर दीपमाला काळे यांच्या पुढाकाराने जळगाव शहराच्या सुशोभीकरणाला वेग
1xbet russia

महापौर दीपमाला काळे यांच्या पुढाकाराने जळगाव शहराच्या सुशोभीकरणाला वेग

April 12, 2026
अजिंठा चौफुलीजवळ इलेक्ट्रिक डीपीला आग
1xbet russia

अजिंठा चौफुलीजवळ इलेक्ट्रिक डीपीला आग

April 12, 2026
आशाताईंच्या सुरांमध्ये निसर्गाची कोमलता
जैन कंपनी

आशाताईंच्या सुरांमध्ये निसर्गाची कोमलता

April 12, 2026
शॉर्ट सर्किटमुळे विठ्ठलवाडीत घराला आग
1xbet russia

शॉर्ट सर्किटमुळे विठ्ठलवाडीत घराला आग

April 12, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

महापौर दीपमाला काळे यांच्या पुढाकाराने जळगाव शहराच्या सुशोभीकरणाला वेग

महापौर दीपमाला काळे यांच्या पुढाकाराने जळगाव शहराच्या सुशोभीकरणाला वेग

April 12, 2026
अजिंठा चौफुलीजवळ इलेक्ट्रिक डीपीला आग

अजिंठा चौफुलीजवळ इलेक्ट्रिक डीपीला आग

April 12, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon