मुंगसे, ता. अमळनेर (वार्ताहर) – भारत सरकारच्या महिला बाल विकास खात्याच्या केंद्रीय मंत्री स्मृति ईराणी आज दि. 6 रोजी आल्या होत्या.


महिला मंत्री आज मुंबईत आहेत हे समजल्यानंतर महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कृती समितीने माननीय सचिव महिला व बाल विकास विभाग महाराष्ट्र राज्य आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना यांच्या मध्यस्थीने स्मृती इराणी केंद्रीय मंत्री महिला व बाल विकास विभाग भारत सरकार यांची भेट मिळवण्याचा प्रयत्न केला स्मृती इराणी महिला व बाल विकास विभाग भारत सरकार यांच्याशी दुपारी चार वाजता एका स्वतंत्र रूममध्ये भेटीची व्यवस्था करण्यात आली होती स्मृती इराणी मंत्री , कुंदन सचिव महिला व बाल विकास विभाग व श्रीमती रुबल अग्रवाल आयुक्त या तिघींनी अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर अंगणवाडी कृती समितीचे अध्यक्ष महोदय एम ए पाटील व सहकारी सभासद यांनी पोषण ट्रॅकर ॲप मराठीत करा, नवीन मोबाईल ताबडतोब द्या ,लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या पूरक पोषण आहाराच्या रकमेत दुप्पट वाढ करणे, निर्दोष व मराठी ॲप पोषण ट्रॅकर ताबडतोब देणे, तसेच अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचार्यांचा दर्जा देणे.अंगणवाडी कर्मचार्यांना पेन्शन योजना लागु करणे. मानधनवाढ करण्यात यावी.मिनी अंगणवाडी सेविका यांना अंगणवाडी सेविका यांचे ऐवढे मानधन देण्यात यावे. निकृष्ट शासकीय मोबाईल या संबंधित प्रश्नांवर सविस्तरपणे चर्चा करण्यात आली. केंद्रीय मंत्री यांनी मोबाईलची जबाबदारी राज्य सरकारची आहे असे स्पष्ट केले तरी सचिव यांनी मोबाईल संदर्भात संघटनेशी चर्चा करून निर्णय घेऊ असे असे आश्वासन दिले परंतु केंद्रीय मंत्री व मराठी पोषण ट्रॅकर ॲप देण्याबाबत कोणतेही आश्वासन दिले नाही याप्रसंगी शिष्टमंडळात एम. ए .पाटील अरमायटी इराणी, नंदा पेडणेकर ज्योती भाटवडेकर ,नफिसा नाखवा, संगीता चाचले, राजेश सिंह ,मीना मोहिते, संगीता शिंदे ,यांचा समावेश होता. असे भानुदास पाटील संघटक सचिव महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघ ठाणे जळगाव धुळे जिल्हा यांनी कळविले आहे.







