जळगाव मनपावर महायुतीचा भगवा फडकला ; महायुतीला स्पष्ट बहुमत
शिवसेना उबाठा गटाचे ५ उमेदवार विजयी ; एका अपक्षाने मारली बाजी
जळगाव प्रतिनिधी महानगर पालिकेत ७५ जागांचे जवळपास निकाल घोषित झाले असून महायुती चे भाजपचे ६ उमेदवार आणि शिंदेसेनेचे ६ उमेदवार असे एकूण १२ उमेदवार बिनविरोध निवडून आले होते. आज १६ जानेवारी रोजी मतमोजणीअंती भाजपचे ४६ ,शिंदेसेना २२ ,राष्ट्रवादी अजित पवार गट १,,उबाठा ५ ,अपक्ष १ असे पक्षीय बलाबल असून सत्ता प्राप्तीसाठी ३८ चा बहुमताचा आकडा आधीच भाजपने गाठला असून शिंदेसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांची महायुती असल्याने भाजपचा महापौर निर्विवाद होणार असून शिवसेनेचा उपमहापौर होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीचे एकमेव उमेदवार प्रफुल्ल देवकर यांनाही महापालिकेत स्थायी समिती सभापती अथवा एखादे महत्वाचे खाते मिळण्याची शक्यता आहे.



प्रभागनिहाय विजयी उमेदवार पुढील प्रमाणे
प्रभाग क्रमांक १ अ मधून रिता विनोद सपकाळे(भाजप ) ,ब मधून दिलीप बबनराव पोकळे (शिवसेना ) ,क संगीता दांडेकर (शिवसेना ) ,ड मध्ये भारती सागर सोनावणे ( अपक्ष ) , प्रभाग क्रमांक २ मध्ये सागर शामकांत सोनवणे (शिवसेना ),ब उज्ज्वला किशोर बाविस्कर (शिवसेना ),क मध्ये पूजा विजय जगताप (भाजप ) , ड मधून विजय गजानन बांदल (भाजप ) , प्रभाग क्रमांक ३ अ अर्चना संजय पाटील भाजप ),ब मध्ये प्रतीक्षा कैलास सोनवणे (भाजप ) ,क मधून प्रवीण रामदास कोल्हे (शिवसेना ) , ड मधून निलेश विशवनाथ तायडे (भाजप ) प्रभाग क्रमांक ४ अ मध्ये शशीबाई शिवचरण ढंढोरे (भाजप ) ब मध्ये विद्या मुकुंद सोनावणे (भाजप ) , क मधून कल्पेश कैलास सोनवणे (भाजप ) ,ड मध्ये पियुष ललित कोल्हे (शिवसेना ) ,प्रभाग क्रमांक ५ अ मध्ये विष्णू रामदास भंगाळे (शिवसेना ) ,ब मंगला संजय चौधरी ( शिवसेना ) , क आशा रमेश पाटील (भाजप ), ड मधून नितीन बालमुकुंद लड्ढा (भाजप ) प्रभाग क्रमांक ६ अ मध्ये अर्शिन बानो शोएब खाटीक (शिवसेना उबाठा ) ब मध्ये शुचिता अतुल हाडा (भाजप ) क मधून अमित पांडुरंग काळे (भाजप ) ड मध्ये दीपक प्रभाकर सूर्यवंशी (भाजप ) प्रभाग क्रमांक ७ अ मध्ये दीपमाला मनोज काळे (भाजप ) ,ब मध्ये अंकिता पंकज पाटील (भाजप ) क विशाल सुरेश भोळे (भाजप ) ड मध्ये चंद्रशेखर अत्तरदे (भाजप ) , प्रभाग क्रमांक ८ अ मधून ता सागर पाटील (भाजप ) ब मधून मानसी निलेश भोईटे (भाजप ) , क अमर जैन ( भाजप ) , ड नरेंद्र आत्माराम पाटील (शिवसेना ) , प्रभाग क्रमांक ९ अ मध्ये मनोज सुरेश चौधरी (शिवसेना ) ,ब मधून प्रतिभा गजानन देशमुख (शिवसेना ) , क जयश्री राहुल पाटील (भाजप ) ,ड मधून चंद्रशेखर शिवाजी पाटील (भाजप ) , प्रभाग क्रमांक १० अ मधून सुरेश माणिक सोनवणे (भाजप ) ब मधून माधुरी अतुल बारी (भाजप ) ,क मध्ये कविता किरण भोई ( भाजप ) , ड मध्ये जाकीर खान रसूल खान (भाजप ) प्रभाग क्रमांक ११ मध्ये अ डॉ. अमृता चंद्रकांत सोनवणे (शिवसेना ) ,ब मध्ये संतोष मोतीराम पाटील (शिवसेना ) ,क सिंधुताई विजय कोल्हे (शिवसेना ) ,ड ललित विजय कोल्हे (शिवसेना ) ,प्रभाग क्रमांक १२ मधून अनिल अडकमोल (भाजप ),ब उज्ज्वला बेंडाळे (भाजप ),क गायत्री राणे (भाजप ), ड मध्ये नितीन बरडे (भाजप ), प्रभाग क्रमांक १३ अ नितीन सपके (भाजप ),ब मधून सुरेखा नितीन तायडे (भाजप ), क मध्ये वैशाली अमित पाटील (भाजप ), ड प्रफुल्ल गुलाबराव देवकर (राष्ट्रवादी अजित पवार गट ), प्रभाग क्रमांक १४ अ मधून सुनील सुपडू महाजन (भाजप ),ब मधून जयश्री सुनील महाजन (भाजप ),क मध्ये राबियाबी अमजद खान (भाजप ),ड मधून रितिका संजय ढेकळे (भाजप ),प्रभाग १५ अ मधून अरविंद देशमुख (भाजप ),ब कलाबाई नारायण शिरसाळे (भाजप ), क रेशमा कुंदन काळे (शिवसेना ),ड मध्ये प्रकाश बालाणी (भाजप ), प्रभाग क्रमांक १६ अ मधून डॉ. वीरेन खडके (भाजप ),ब मधून वंदना संतोष इंगळे (भाजप ) , क रंजना विजय वानखेडे (भाजप ), ड मध्ये सुनील वामनराव खडके (भाजप ),प्रभाग क्रमांक १७ अ मध्ये जरीनाबी शब्बीर शहा(उबाठा ) ,ब हीनाबी शाकीर खान(उबाठा ) , इब्राहिम पटेल(उबाठा ) ड अक्षय वंजारी (उबाठा ) प्रभाग क्रमांक १८ अ डॉ. गौरव चंद्रकांत सोनवणे (शिवसेना ),ब मध्ये नलूबाई तुळशीदास सोनवणे (शिवसेना ),क मध्ये अनिता सुरेश भापसे (शिवसेना ),प्रभाग क्रमांक १९ अ मध्ये रेखा चुडामण पाटील (शिवसेना ),ब गणेश (विक्रम ) सोनवणे (शिवसेना ), क मध्ये निकिता दुर्गेश वंजारी (शिवसेना ), ड मध्ये राजेंद्र घुगे पाटील ( भाजप ) यांचा विजयी उमेदवारांमध्ये समावेश आहे.









