जळगाव (प्रतिनिधी) – कोरोना साथीच्या काळातही रेल्वे प्रशासन सावधगिरीने आपले काम करीत आहे. या गंभीर साथीच्या काळातही मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाच्या वाणिज्य विभागाकडून बिना तिकिटे प्रवास करणारे, अनियमित तिकीट यात्रा, ज्येष्ठ नागरिक सवलतीचा गैरवापर हे रोखण्यासाठी विशेष तिकीट तपासणी मोहीम ही दिनांक 3 ऑक्टोबरपासून राबविण्यात आली. सुरुवातीला भुसावळ ते नासिक दरम्यान ट्रेन क्रमांक 01056 , ट्रेन क्रमांक 02534, या गाडी मध्ये विशेष तिकीट अभियान हे विशेष तिकीट तपासणी निरीक्षक वाय डी पाठक यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आले.
भुसावळचे वरीष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक युवराज पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार व विभागीय वाणिज्य व्यवस्थापक बी. अरुण कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 3 ऑक्टोबरपासून या कालावधीत विशेष तिकीट तपासणी मोहीम आयोजित करण्यात आली होती. या मोहिममध्ये एकूण 63 अनियमित प्रवाशांना दंड आकारण्यात आल आहे. 11 तिकीट तपासणी कर्मचारी आणि 4 आरपीएफ स्टाफ यांनी प्रवाशांकडून एकूण 64235 / – रूपये दंड वसूल केला आहे. या मोहिमध्ये बिना तिकीट प्रवास करणारे 54 केसेस 50180./ – रुपयाचा दंड वसूल , तिकिटांच्या बदलीचे 1 केसेस मधून 3255/ – रुपयाचा दंड वसूल , ज्येष्ठ नागरिक कोट्याचा गैरवापर केल्याबद्दल 8 केसेस मधून 10800 रुपयाचा दंड वसूल आकारले गेले आहे. मध्य रेल्वे भुसावळ मंडळ ने सर्व प्रवाशांना योग्य तिकिटासह प्रवास करण्याची विनंती केली आहे व कोरोनाला साथीच्या रोगाचा धोका टाळण्यासाठी दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन केले आहे.