• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

शासकीय लाभ घेणारे मधुमक्षिका पालन प्रकल्प गायब, सरकारी बैठकीत उघड

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
February 16, 2024
in कृषी, खान्देश, जळगाव
0
शासकीय लाभ घेणारे मधुमक्षिका पालन प्रकल्प गायब, सरकारी बैठकीत उघड

जिल्ह्यातील हरितगृह, शेडनेट तपासणी अहवाल सादर, ३२८ शेतक-यांना लाभ

नोटीस दिलेल्या शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर आता बोजा 

जळगाव (प्रतिनिधी) :- कृषी विभागाच्या कामाला अधिक गती यावी म्हणून सर्व कृषी समित्यांची बैठक आता जिल्हाधिकारी यांच्या निर्णयानुसार दर महिन्याच्या तिसऱ्या गुरुवारी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. तालुका कृषी अधिकाऱ्यांच्या कामाचे मूल्यमापन करून त्यांना प्रोत्साहन म्हणून गौरविण्यात येईल असे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी बैठकीत निर्णय घेतला.

जिल्हाधिकारी कार्यालयात  जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, उपविभागीय कृषि अधिकारी व तालुका कृषि अधिकरी व शासकीय सदस्यांना आमंत्रित करुन विविध शासकीय समित्यांची मासिक आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हाधिकारी यांच्या सुचनेवरून जळगांव जिल्हयातील सर्व तालुका कृषि अधिकारी यांची सन २०२३-२४ गोपनीय अहवालाची माहिती भरते वेळी कृषि विभागामार्फत राबविण्यात येणा-या योजनेची प्रगतीच्या आधारावर १ ते १०  गुणांकन देण्यात यावे. या योजनेतील तालुक्याच्या प्रगतीच्या आधारावर उत्कृष्ट तालुका कृषि अधिकारी यांची क्रमवारी ठरवुन उत्कृष्ट अधिकारी यांचे जाहीर करुन त्यांचा गौरव करण्यात यावा व याबाबत माध्यमातून प्रसिद्धी द्यावी जेणे करून इतरांनाही कामाची प्रेरणा मिळेल असे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले.

जिल्ह्यातील हरितगृह, शेडनेट तपासणी अहवाल सादर
नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पांतर्गत वैयक्तिक बाबीमधील संरक्षित शेती घटकांतर्गत मोका तपासणी होऊन अनुदान अदायगी झालेल्या हरितगृह व शेडनेट गृह यांची १०० टक्के फेर तपासणीचा यावेळी अहवाल सादर करण्यात आला. या अहवालानुसार जळगांव जिल्हयात एकूण ३२८ शेतक-यांना हरितगृह व शेडनेट यांचा लाभ देण्यात आलेला आहे. फेरतपासणी करते वेळी २९१ हरितगृह व शेडनेट सुस्थितीत जागेवर आढळुन आलेले होते. व एकुण ३७ हरितगृह व शेडनेट ( वसुल पात्र रक्कम रुपये ५ कोटी ७४ लाख २१ हजार २८५ रुपये) उपविभागीय कृषि अधिकारी यांच्या अहवालानुसार अनुदान दिलेल्या गटात आढळून आलेले नाहीत. जळगांव जिल्हयात मधुमक्षिका पालन घटकाची फेर तपासणीचा अहवाल सादर करण्यात आला.या अहवालानुसार जळगांव जिल्हयात एकुण ३ मधुमक्षिका पालन प्रकल्प चा लाभ देण्यात आलेला होता. त्यापैकी ३ ही प्रकल्प (वसुल पात्र रक्कम रुपये ४ लाख ९५ हजार रुपये मात्र) जागेवर आढळुन आलेले नाहीत.

हरितगृह, शेडनेट व मधुमक्षिका पालन हे घटक जागेवर न आढळुन आल्यामुळे संबंधीत शेतक-यांना बजाविण्यात आलेल्या वसुली बाबतची नोटीसचा कालावधी संपल्यानंतर जे शेतकरी वसुलीची रक्कम भरणार नाहीत अशा शेतक-यांनावर विहीत कार्यपध्दतीचा अवलंब करुन रक्कम वसुल करण्यात यावी. तसेच वसुल न झाल्यास संबधीत शेतक-यांच्या ७/१२ उता- यांवर बोजा चढविण्यात यावा असे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले व पुढील आढावा बैठक दिनांक २६ फेब्रुवारी २०२४ रोजी आयोजित करण्यात यावी अशा सूचना कृषी विभागाला केल्याची माहिती जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी चंद्रकांत पाटील यांनी दिली.


 

 

Tags: #jalgaon news #maharashtra #bharathttps://kesariraj.com/madhumakshika-palan-prakalp/
Previous Post

जागतिक सुर्यनमस्कार दिनानिमित्त सामुहिक सुर्यनमस्कार शिबीर

Next Post

माहिती न दिल्याने वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधीक्षकांना धमकावले

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
माहिती न दिल्याने वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधीक्षकांना धमकावले

माहिती न दिल्याने वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधीक्षकांना धमकावले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शिरसोली येथील बेपत्ता तरुणाचा नेव्हरे धरणात आढळला मृतदेह; आत्महत्या की घातपात ? पोलिसांचा तपास सुरू
1xbet russia

शिरसोली येथील बेपत्ता तरुणाचा नेव्हरे धरणात आढळला मृतदेह; आत्महत्या की घातपात ? पोलिसांचा तपास सुरू

August 24, 2026
ट्रकच्या भीषण धडकेत ९ वर्षाच्या चिमुकल्याचा करुण अंत; कावड यात्रादरम्यान घडली घटना
1xbet russia

ट्रकच्या भीषण धडकेत ९ वर्षाच्या चिमुकल्याचा करुण अंत; कावड यात्रादरम्यान घडली घटना

August 24, 2026
क्रुझरच्या धडकेत आयटीआयच्या विद्यार्थ्याचा मृत्यू; दोघे जखमी
1xbet russia

क्रुझरच्या धडकेत आयटीआयच्या विद्यार्थ्याचा मृत्यू; दोघे जखमी

August 24, 2026
स्वच्छता संस्कार म्हणून रुजण्याची गरज – डॉ. शिल्पा नारायणन
जैन कंपनी

स्वच्छता संस्कार म्हणून रुजण्याची गरज – डॉ. शिल्पा नारायणन

August 24, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

शिरसोली येथील बेपत्ता तरुणाचा नेव्हरे धरणात आढळला मृतदेह; आत्महत्या की घातपात ? पोलिसांचा तपास सुरू

शिरसोली येथील बेपत्ता तरुणाचा नेव्हरे धरणात आढळला मृतदेह; आत्महत्या की घातपात ? पोलिसांचा तपास सुरू

August 24, 2026
ट्रकच्या भीषण धडकेत ९ वर्षाच्या चिमुकल्याचा करुण अंत; कावड यात्रादरम्यान घडली घटना

ट्रकच्या भीषण धडकेत ९ वर्षाच्या चिमुकल्याचा करुण अंत; कावड यात्रादरम्यान घडली घटना

August 24, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon