जळगाव शहरातील येथील घटना
जळगाव (प्रतिनिधी) : माहिती अधिकारात मागितलेली माहिती न मिळाल्याने एका व्यक्तीने थेट वैद्यकीय अधीक्षकांना फोन करून मारहाण करण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार जळगावमधील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव येथे घडला आहे. याप्रकरणी संताप व्यक्त केला जात आहे.
महेंद्र पाटील या इसमाने हा प्रताप केला आहे त्याने काही माहिती माहितीचा अधिकार मागितली होती ती माहिती त्याला न मिळाल्याने त्याने थेट वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय गायकवाड यांना मोबाईलवरून शिवीगाळ केली. रुग्णालयाची तोडफोड करून डॉक्टरांना मारहाण करेल, अशी धमकीही त्याने दिली. या प्रकरणी शुक्रवारी दि. १६ फेब्रुवारी रोजी डॉ. विजय गायकवाड यांच्या तक्रारीवरून जिल्हापेठ पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.