महावितरणतर्फे घरगुती मिटर तपासणी मोहीम
रावेर (प्रतिनिधी) : तालुक्यातील तांदलवाडी परिमंडळात महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीतर्फे विद्युत पुरवठा मीटर तपासणी धडक सत्र राबविण्यात आले. ज्या ग्राहकांचे मीटर तपासणीत नादुरुस्त किंवा छेडछाड केलेले आढळून आले त्या मिटरांना काढून पंचनामा करून जप्त करण्यात आले आहेत.
येथील असिस्टंट इंजिनिअर शीतल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली जळगांव परिमंडळचे सहा. अभियंता प्रवीण बोदेले, रोहित तायडे, कमलेश करपाते, सिनियर टेक्निशियन के. एन. गोसावी, तसेच तांदलवाडी वीज वितरण कार्यालयातील तंत्रज्ञ गयाज शेख, मोहम्मद अन्सार, गुरुदास पाटील, रोशन चौधरी, विजय पाटील यांनी जवळील पुरी- गोलवाडे, सुनोदा आणि तांदलवाडी या गावात विद्युत मीटर तपासणी केली. घरोघरी जाऊन वीज मीटर, सर्व्हिस वायर तपासण्यात आले.
त्यातील ज्या ग्राहकांचे मीटर तपासणीत नादुरुस्त किंवा छेडछाड केलेले आढळून आले त्या मिटरांना काढून पंचनामा करून जप्त करण्यात आले आहेत. तांदलवाडी येथील जवळपास ८ मीटर, सुनोदे येथे ६ तर पुरी गोलवाडे येथे ३ मीटर जप्त करण्यात आले आहेत.