डॉ. नरेंद्र वैद्य यांची स्पेशल ओपीडी जळगावमध्ये
आताच संपर्क करा – 9673859185,8355838808
जळगाव (प्रतिनिधी) – लोकमान्य हॉस्पिटलतर्फे गुडघेदुखीच्या आणि सांधेदुखीच्या रुग्णांसाठी सुपर स्पेशालिटी अस्थिरोग तपासणीचे आयोजन करण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय कीर्तीचे सांधेरोपण तज्ज्ञ डॉ. नरेंद्र वैद्य हे २९ जानेवारीला सकाळी ठिक ७.३० वाजता जळगावमधील अरूश्री हॉस्पिटल, महेश प्रगती मंडळजवळ, रिंग रोड, महेश मार्ग येथे गुडघेदुखी, खुबा, संधिवात तसेच इतर हाडांच्या त्रासाने पिडीत असणाऱ्या रुग्णांची तपासणी करणार आहेत.
डॉ. नरेंद्र वैद्य हे पुण्यातील लोकमान्य हॉस्पिटल या सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलचे व्यवस्थापकीय संचालक आहेत. विविध गावात सुपर स्पेशालिटी ओपीडी आयोजित करून रुग्णांना गुडघेदुखी विषयी मार्गदर्शन, अत्याधुनिक उपचाराची माहिती व तपासणी केली जात आहे. रुग्णांनी तपासणीसाठी येताना आपले पूर्वीचे रिपोर्ट, एक्सरे आणि अन्य काही रिपोर्ट आपल्या सोबत आणणे आवश्यक आहे.
गुडघेदुखी ही समस्या ही आता ज्येष्ठ नागरिकांपुरती मर्यादित न राहता तरुणांमध्येही मोठ्या प्रमाणात असल्याचे दिसून येत आहे. बदलत्या जीवनशैलीमुळे, वाढत्या वजनामुळे गुडघ्यांच्या समस्यांनी अधिकच गुडघेदुखी होते. गुडघ्याची तपासणी जर सुरुवातीच्या अवस्थेत केली तर औषधे व्यायामांनी आराम होतो. पण जर गुडघ्यातील कुर्चेची झीज झाली असेल तर मात्र आजकाल दुर्बिणीद्वारे उपचार, पीआरपी इंजेक्शन याद्वारे करता येतात.
अंतिम टप्प्यातील झीज, पायाला बाक आला तर मात्र सांधेरोपण शस्त्रक्रिया हाच पर्याय असतो. यात आता अमूलाग्र बदल होऊन रोबोटीकचा सहभाग यशस्वी ठरतो आहे. ही यंत्रणा भारतात आणून रुग्णांना उपलब्ध करुन देणारे विख्यात तज्ञ्ज डॉ. नरेंद्र वैद्य स्वतः रुग्णांची तपासणी करणार आहेत.
डॉ. नरेंद्र वैद्य हे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे गुडघेरोपण आणि मणक्याचे तज्ज्ञ म्हणून ओळखले जातात. जगातील दहा देशात त्यांनी अवघड शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पाडल्या आहेत. ४५,००० हून अधिक गुडघेरोपण शस्त्रक्रिया १२००० रोबोटीक तंत्रज्ञानाचा वापर करून आणि १,५०,००० हून अन्य अस्थिरोग शस्त्रक्रिया त्यांनी केल्या आहेत. रोबोटीक शस्त्रक्रियेचे अमेरिका, जर्मनी आणि स्वीडन येथे प्रशिक्षण त्यांनी घेतले आहे. गुडघ्याच्या सांधेरोपण शस्त्रक्रियेतील रोबोच्या सहाय्याने सांधेरोपण हे तंत्रज्ञान अमेरिकेबाहेर भारतात प्रथम आणून त्यांनी १२००० पेक्षा अधिक शस्त्रक्रिया यशस्वी केल्या आहेत.