जळगावातील रामेश्वर कॉलनीतील घटना
जळगाव (प्रतिनिधी) – येथील रामेश्वर कॉलनीमध्ये कोम्बिंग ऑपरेशनदरम्यान माहिती मिळाल्यावरून एका तरुणाकडून एमआयडीसी पोलिसांनी धारदार सुरा जप्त केला आहे. सोमवारी १७ जुलै रोजी एमआयडीसी पोलिसांच्या पथकाने हि कारवाई केली.
पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांना गोपनीय माहिती मिळाली. त्यावरून पोलिसांच्या पथकाने रामेश्वर कॉलनी येथे जाऊन कारवाई केली. संशयित आरोपी विशाल मुरलीधर दाभाडे (वय २२ वर्ष, रा. रामेश्वर कॉलनी, जळगाव) यास ताब्यात घेतले. त्याच्या ताब्यातून लोखंडी धारदार सुरा पोलिसांनी जप्त केला आहे. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल सतीश गर्जे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संशयित विशाल दाभाडे याला जळगाव जिल्हयातुन ०२ वर्षाकरीता हद्दपार करण्यात आलेला आहे. तरीही तो जळगावात आढळला आहे. कारवाईप्रकरणी फिर्यादीसह पो.उप निरी. रविंद्र गिरासे, स. फौ.अतुल वंजारी, पो.ना. इम्रान सैय्यद, पो.ना. सचिन पाटील, पो.ना. सुधीर सावळे, पो.ना.मुदस्सर काझी यांनी परिश्रम घेतले.