पाचोरा ( प्रतिनिधी ) – तालुक्यातील बांबरुड राणीचे येथे माजी आमदार दिलीप वाघ यांचे मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस व ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने आणि प्राथमिक आरोग्य केंद्र (नांद्रा) यांचे सहकार्याने आयोजित शिबिरात 2500 लोकांचे कोरोना लसीकरण करण्यात आले.


पंचायत समिती गटनेते ललीत वाघ , पंचायत समितीचे माजी सभापती नितीन तावडे यांच्या विशेष प्रयत्नाने सोमवारी हे लसीकरण शिबिर संपन्न झाले. शिबिराचं उद्घाटन माजी आमदार दिलीप वाघ व पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे चेअरमन तथा गटनेते संजय वाघ यांच्या हस्ते करण्यात आले शिबीरात 2500 डोस उपलब्ध करण्यात आले होते पाच बूथ लावून महिला ,पुरुषासाठी वेगवेगळे बूथचे नियोजन करण्यात आले होते.नागरिकांनी या शिबिरात उत्साहाने लशिकरण करून घेतले.

यावेळी पं. स.गटनेते ललित वाघ, स्थानिक चेअरमन दगाजी वाघ, विधानसभा क्षेत्र प्रमुख नितीन तावडे, बांबरुड राणीचे येथील सरपंच अस्तना तडवी , उपसरपंच शशिकांत वाघ , ग्रामपंचायत सदस्य गुलाब तडवी, राजेंद्र गवांडे, प्रेमराज शेवगे, प्रदीप वाघ, पिताम्बर बाविस्कर, श्रीमती शोभा वाघ, अली मेवाती, सुभाष शिंदे, विकासो चेअरमन सुधाकर शेळके, बुरहान तडवी , गजानन वाघ , प्राचार्य डी . व्ही. पाटील , पर्यवेक्षक जी.एन. पाटील, निलेश पाटील , गौरव पाटील , हेमंत पाटील , प्रशांत पाटील आदी उपस्थित होते.
यावेळी नांद्रा प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी प्रवीण रायगडे , मायाताई सोनवणे , श्रीमती गढरी यांनी लसीकरणाचे काम चोख पार पाडले बांबरुड राणीचे ग्रामपंचायत कर्मचारी तसेच माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.







