जळगाव (प्रतिनिधी ) ;- जिल्ह्यात केवळ ४०० लसींचा साठा उपलब्ध अाहे. यात ३०० काेविशिल्ड तर १०० काेव्हॅक्सिन अाहेत. त्यात जिल्हा सामान्य रुग्णालय १४० काेविशिल्ड, पाराेळा ९० काेव्हॅक्सिन, भुसावळ ग्रामीण रुग्णालय ८० काेविशिल्ड, अमळनेर १० काेवॅक्सिन, सावदा ४० काेविशिल्ड, वरणगाव १० काेविशिल्ड, अमळगाव, अमळनेर ३० काेवशिल्ड लस उपलब्ध असून या ठिकाणीच लसीकरण हाेणार अाहे.