मुंबई (वृत्तसंस्था) ;- रविवारी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी मुंबईमध्ये दीड लाख लसींचा साठा दाखल झाल्याची माहिती दिली. त्यानंतर नागरिकांनी सोमवारी पहाटे ४ वाजल्यांपासून कोविड लसीकरण केंद्रांसमोर लांबच लांब रांगा लावल्याचे चित्र होते. गोरेगाव, बीकेसी कोविड लसीकरण केंद्रांसमोर लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. हीच परिस्थिती मुंबईतील इतर १३० लसीकरण केंद्रांसमोरही आहे. लशी आल्या मात्र, नियोजन व्यवस्तीत नसल्याने नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. व्यवस्थित माहिती मिळत नसल्याने पुन्हा रिकाम्या हातांनीच घरी परतावे लागत आहेत.








