जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी यांची माहिती
जळगाव (प्रतिनिधी) : गेल्या वर्षी जिल्ह्यात गायवर्गीय जनावरांना लम्पीच्या बाधा झाल्याने शेतकऱ्यांच्या पशुधनाची मोठ्या प्रमाणात हानी झाली होती. त्यात अनेक जनावरे दगावली होती. मात्र यंदा शासनाने पावसाळ्यापूर्वीच लम्पीची लस उपलब्ध केली. पशुसंवर्धन विभागाने जिल्ह्यातील ४ लाख १० हजार गुरांना लम्पीची लस दिल्याचे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी तडवी यांनी सांगितले.
जिल्ह्यात गाय वर्गीय जनावरांचे लम्पीचे ८० टक्के लसीकरण पूर्ण झाले आहे. जिल्ह्यात गाय वर्गीय गुरांची संख्या ५ लाख ७७ हजार आहे. जिल्ह्याला ४ लाख ६१ हजार ८०० लसी प्राप्त झाल्या होत्या. अजूनही २० टक्के गुरांचे लसीकरण अजूनही बाकी आहे. जिल्ह्यात गतवर्षी यावल, रावेर चोपडा, जामनेर या तालुक्यात ८० टक्के लसीकरण पूर्ण मृत्यू झाला होता. त्यानंतर सर्वाधिक जनावरांचा चाळीसगाव, भडगाव, पाचोरा तालुक्यात लम्पीची लागण झाल्याने मृत्यूमुखी झालेल्या जनावरांच्या संख्येत वाढ झाली होती. त्यासाठी जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून मृत्यू झालेल्या पशुधन मालकास अर्थात शेतकऱ्यांना मदत देण्यात आली होती. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला होता.
जिल्ह्यात सन २०२२-२३ मध्ये लम्पीने कहर केला होता. लम्पीच्या बाधेमुळे जनावरांचा मृत्यू झाल्याने शेतकरी हवालिदल झाले होते. यंदा मात्र लसीकरण वेळेत झाल्याने सद्यस्थितीत जिल्ह्यात बाधित एकही बाधित जनावर नसल्याचे पशुसंवर्धन विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.