जळगाव (प्रतिनिधी) – येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक लक्ष्मण पाटील यांनी भारत राष्ट्र समितीमध्ये तेलंगणाचे मुख्यमंत्री तथा पक्षप्रमुख सी. चंद्रशेखर राव यांच्या उपस्थितीत प्रवेश केला आहे.
प्रवेश करतेवेळी कानळदा येथील भगवान धनगर, प्रमोद झंवर, गणेश पाटील, संदीप पाटील, नाना बच्छाव, माणिकराव कदम आदी उपस्थित होते. जळगाव जिल्ह्यात बीआरएस पक्षाचे संघटन मजबूत करण्यासाठी आगामी काळात प्रयत्न केले जातील असे लक्ष्मण पाटील यांनी सांगितले.