ठाणे ( प्रतिनिधी ) – मॅट्रिमोनियल साईट्सवर फेक प्रोफाइल तयार करुन अनेक महिलांची फसवणूक करणाऱ्या भामट्याला अटक करण्यात आली आहे. आपण वैज्ञानिक असल्याची खोटी माहिती प्रोफाईलमध्ये लिहून महिलांना लुबाडले या भामट्याने 15 महिलांना गंडवले . आधीच लग्न झालेलं असताना देखील आरोपीने मॅट्रिमोनियल साईट्सवर नाव नोंदवलं आणि भोळ्या महिलांना टार्गेट केलं आरोपीने या महिलांकडून एक कोटी रुपये उकळले ठाणे गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत.
पोलिसांनी म्हात्रे नावाच्या भामट्याला रायगडमधील उरण येथून अटक केली. 2017 मध्ये लग्न झाल्यानंतर या ठगाने हा धंदा सुरु केला. आपण वैज्ञानिक असल्याची खोटी माहिती प्रोफाईलमध्ये लिहून त्याने महिलांची फसवणूक केली.
जवळपास 15 महिलांकडून तब्बल एक कोटी रुपये उकळल्याची माहिती अप्पर पोलीस आयुक्त अशोक मोराळे यांनी दिली. मॅट्रिमोनियल साईट्सवर वरसंशोधन करतांना महिलांनी अत्यंत सतर्क रहावे असे आवाहन पोलिसांनी केले आहे.