• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

खळबळ, शहरातील दोघा हॉटेलमध्ये सुरू असलेला कुंटणखाना पोलिसांनी उधळला !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
December 22, 2024
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
पाईप चोरी प्रकरणाच्या तपासासाठी एसआयटी पथक नियुक्ती

बांगलादेशी तरुणीसह पाच जण ताब्यात : डीवायएसपी पथकाची कारवाई

जळगाव ( प्रतिनिधी ) – शहरातील गोदावरी इंजिनिअरिंग कॉलेजजवळ असलेल्या २ हॉटेलमध्ये उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या पथकाने छापा टाकला. हॉटेलमध्ये कुंटणखाना सुरू असल्याने पोलिसांनी कारवाई केली. कारवाईत एका महिलेची सुटका करण्यात आली असून चौघांना ताब्यात घेण्यात आले आहे. दरम्यान, एका बांगलादेशी तरुणीला देखील पोलिसांनी अटक केली असून ती बेकायदा वास्तव्यास असल्याचे समोर आले आहे.

शहरातील एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीत गोदावरी इंजिनिअरिंग कॉलेजजवळ हॉटेल चित्रकूटमध्ये कुंटनखाना सुरू असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांना मिळाली होती. त्यांनी लागलीच पथक रवाना केले. पंच आणि नकली ग्राहकाच्या मदतीने पथकाने पडताळणी केली. कारवाईत जवळच असलेल्या हॉटेल यशमध्ये देखील एक महिला आढळून आली.

पोलीस पथकाने हॉटेल चित्रकूटमध्ये एक डमी ग्राहक पाठविला व त्यास काही आढळल्यास मिस कॉल देण्यास सांगितले. त्यानुसार डमी ग्राहकाने मिस कॉल दिला व एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संदीप पाटील, सपोनि गणेश वाघ, उपविभागीय कार्यालयाचे पोहेकॉ विकास महाजन, सुहास पाटील, पोकॉ गोपाल पाटील, चंद्रकांत पाटील, सोनाली चव्हाण गणेश ठाकरे, सिद्धेश्वर डापकर या पथकाने तेथे छापा टाकला असता काउंटरवर नीलेश गुजर व चेतन माळी आढळले. त्यांची अंगझडती घेतली असता डमी ग्राहकाने दिलेले १५०० रुपये, मोबाईल आढळले. हॉटेलमधील एका खोलीत डमी ग्राहक व एक महिला आढळली.

पोलिसांनी हॉटेल चित्रकूटमध्ये आढलेल्या महिलेची चौकशी केली असता हॉटेल यशचा व्यवस्थापक विजय सखाराम तायडे याच्यामार्फत ती येथे आल्याची माहिती तिने पोलिसांना दिली. तसेच तिच्या सोबत असलेली दुसरी महिला हॉटेल यशमध्ये असल्याचे सांगितले. तेथून व्यवस्थापक विजय तायडे याच्यासह एका तरुणीला ताब्यात घेतले. ती तरुणी बांगलादेशी असल्याचे आढळून आले. बांगलादेशी तरुणीकडे कोणतेही दस्ताऐवज आढळून आले नाही.

हॉटेल यशचा व्यवस्थापक विजय तायडे याच्याशी बांगलादेशी तरुणीचा संपर्क झाला व देहव्यापारातून तिला पैसे दिले जाणार असल्याचे सांगून तिला येथे आणले असल्याची माहिती सदर तरुणीने पोलिसांना दिली. तिच्याजवळ एक मोबाईलही आढळून आला. याप्रकरणी पोकॉ गोपाल पाटील यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून नीलेश गुजर, चेतन माळी, विजय तायडे या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच बांगलादेशी तरुणीविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtrakutankhana-polisani-pakdla
Previous Post

खातेवाटपानंतर आता सुरु झाली “पालकमंत्री”पदाची चर्चा, जळगाव पुन्हा गुलाबरावांकडे ?

Next Post

समाजाशी नाळ जोडून ठेवणे आपले कर्तव्य : आ. राजूमामा भोळे

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
समाजाशी नाळ जोडून ठेवणे आपले कर्तव्य : आ. राजूमामा भोळे

समाजाशी नाळ जोडून ठेवणे आपले कर्तव्य : आ. राजूमामा भोळे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महापौरांचा दणका! टॉवर चौकातील जैन मंदिरापुढील अतिक्रमण हटवले
Uncategorized

महापौरांचा दणका! टॉवर चौकातील जैन मंदिरापुढील अतिक्रमण हटवले

March 6, 2026
आकाश त्रिवेदी IAS यादीत ७३ वा एरंडोलच्या सुपुत्राने उज्ज्वल केले जिल्ह्याचे नाव
1xbet russia

आकाश त्रिवेदी IAS यादीत ७३ वा एरंडोलच्या सुपुत्राने उज्ज्वल केले जिल्ह्याचे नाव

March 6, 2026
महिलांसाठी स्वच्छतागृहे, सॅनिटरी नॅपकीन सुविधा उपलब्ध करून द्यावी!
1xbet russia

महिलांसाठी स्वच्छतागृहे, सॅनिटरी नॅपकीन सुविधा उपलब्ध करून द्यावी!

March 6, 2026
वीजबिल वसुलीसह ग्राहकांना सर्वोत्तम सेवा द्या
1xbet russia

वीजबिल वसुलीसह ग्राहकांना सर्वोत्तम सेवा द्या

March 6, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

महापौरांचा दणका! टॉवर चौकातील जैन मंदिरापुढील अतिक्रमण हटवले

महापौरांचा दणका! टॉवर चौकातील जैन मंदिरापुढील अतिक्रमण हटवले

March 6, 2026
आकाश त्रिवेदी IAS यादीत ७३ वा एरंडोलच्या सुपुत्राने उज्ज्वल केले जिल्ह्याचे नाव

आकाश त्रिवेदी IAS यादीत ७३ वा एरंडोलच्या सुपुत्राने उज्ज्वल केले जिल्ह्याचे नाव

March 6, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon