पाचोरा ( प्रतिनिधी ) – कुरंगी गाव आणि परिसरात हल्ले करून लोकांना जखमी करणाऱ्या २ वानरांना पकडण्यात आज वन विभागाच्या पथकाला यश आले आहे .
तीन महिन्यांपासुन कुरंगी गावात हल्लाखोर वानरांनी १०० च्या वर दुचाकी गाड्यांचे नुकसान केले होते. एवढेच नव्हे तर १० दिवसांपासुन गावातील नागरीक व महिला आणि लहान मुलांवर हल्ला चढवत होता या वानरांनी जवळपास २० लोकांवर हल्ला केल्याने त्यांची दहशत परीसरात होती.
शेवटी वनविभागाचे धिकारी देवरे हे त्यांचे वरिष्ठ अजयकुमार जैस्वाल यांनी फोन करून सुचना दिल्यानंतर पथकासह गावात दाखल झाले आज निसर्ग राजा न्युजचे संपादक आतिष चांगरे यांच्या सहकार्याने तब्बल दोन तासानंतर हल्लाखोर दोन वानरांना पकडण्यात यश आले.