गोदावरीतर्फे कर्मयोगी डॉ.सुधाकर पाटील यांचा अमृत महोत्सव सोहळा थाटात
जळगाव (प्रतिनिधी) – कृषीप्रधान संस्कृती असलेल्या भारत देशात डॉ.सुधाकर पाटील हे कृषी क्षेत्राचे अगाध ज्ञान असलेले कृषीतुल्य व्यक्तीमत्व आपल्या गोदावरी फाऊंडेशनमध्ये आहे, याचा मला सार्थ अभिमान आहे. डॉ.पाटील यांनी येथील कृषी महाविद्यालयाच्या विकासाबाबत जे योगदान दिले आहे ते अनमोल आहे. अनेक विद्यार्थ्यांचे व प्राध्यापकांचे ते मॅनेजमेंट गुरु आहेत. त्यांच्यासारख्या हुशार आणि अनुभवी व्यक्तीमत्वाचा सहवास आम्हाला लाभला, हे आमचे अहोभाग्यच आहे असे सांगत गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ.उल्हास पाटील यांनी निरोगी दिर्घायुष्याच्या शुभेच्छा दिल्यात.
निमित्त होते गोदावरी फाऊंडेशन संचलित डॉ.उल्हास पाटील कृषी महाविद्यालयाचे परिसर संचालक डॉ.सुधाकर पाटील यांच्या ७५ व्या वाढदिवसाचे.. त्यानिमित्त कृषी महाविद्यालयातर्फे बुधवार दि.१९ जुलै रोजी अमृत महोत्सव सोहळा आयोजित केला होता. याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन डॉ.उल्हास पाटील यांनी कर्मयोगी डॉ.सुधाकर पाटील यांचा ७५ व्या वर्षीही असलेला कामाचा उत्साहा याचे कौतुक करुन तरुणांनीही आदर्श घ्यावा, असे आवाहन केले. याप्रसंगी व्यासपीठावर गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ.उल्हास पाटील, सचिव डॉ.वर्षा पाटील, उत्सवमूर्ती डॉ.सुधाकर पाटील व सौ.पाटील, गोदावरी कृषी विभागाचे शिक्षण व संशोधन संचालक डॉ.अशोक चौधरी, डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.एन.एस.आर्विकर, गोदावरी अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ.विजयकुमार पाटील, हॉटेल मॅनेजमेंटचे संचालक डॉ.पुनीत बस्सन, प्राचार्य डॉ.पी आर सपकाळे, प्राचार्य डॉ.शैलेश तायडे, हॉर्टिकल्चरचे प्रा.सतीश सावके, अन्नपूर्णालयमचे राजपुरोहित डी टी राव हे उपस्थीत होते. याप्रसंगी उत्सवमूर्ती डॉ.एस.एम.पाटील यांचा शाल, श्रीफळ व जीवन गौरव सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. मान्यवरांनी आपल्या मनोगताद्वारे डॉ.सुधाकर पाटील यांच्याबद्दलची आत्मीयता व्यक्त केली, यात डॉ.आर्विकर यांनी सांगितले की, डॉ.एस एम पाटील सर हे टिचर, फ्यूचर आणि केअरटेकर आहेत, त्याचा लाभ अनेक कृषी शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांना झाला. यानंतर गोदावरी फाऊंडेशनच्या सचिव डॉ.वर्षा पाटील यांनी देखील डॉ.एस.एम.पाटील सर यांच्याबद्दल मनोगत व्यक्त करुन अभिष्टचिंतन सोहळ्याच्या सदिच्छा व्यक्त केल्यात. याप्रसंगी उत्सवमुर्ती डॉ.सुधाकर पाटील यांनी सत्काराला उत्तर देतांना सांगितले की, गोदावरी फाऊंडेशनच्या वतीने केलेला हा सोहळा भावनीक झाला, गेल्या अनेक वर्षांपासून कुटुंबाशी असलेले आपुलकीचे नाते केसे जोडले गेले ते कळालं सुध्दा नसल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.मुयरी देशमुख यांनी तर आभार प्रा.करण बनसोडे यांनी मानले.
—अल्प परिचय–
मुळचे नांदूरा खुर्द, जि. बुलढाणा व व्यंकटेश नगर, राधाकृष्ण टॉकीजच्या मागे, अकोला, जि. अकोला येथे स्थायीक झालेले प्रा.डॉ. सुधाकर मधुकर पाटील.यांनी एम.एस्सी. (कृषी) पीएच. डी. (कृषी विद्या) केल्यानंतर कृषी व संबंधित शिक्षण परिसर, जळगांव. प्रमुख शास्त्रज्ञ, अखिल भारतीय कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्प, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला (६ वर्षे) प्रभारी व नियमित कृषी हवामान शास्त्रज्ञ, डॉ. पं.दे.कृ.वि. अकोला (२४ वर्षे) मध्यस्थ अधिकारी, कृषी हवामान शास्त्र विभाग व डॉ. पं.दे.कृ.वि., अकोला. केंद्रिय अधिकारी, राष्ट्रीय केंद्र, मध्यम कालावधी हवामान अंदाज, डॉ. पं.दे.कृ.वि., अकोला. (१० वर्ष) केंद्रिय अधिकारी, महाराष्ट्र सुदृर संवेदन केंद्र (एम.आर.एस.ए.सी.), नागपूर व डॉ. पं.दे.कृ.वि., आकोला. (५ वर्षे) केंद्रिय अधिकारी, राष्ट्रीय कृषी तंत्रज्ञान प्रकल्प, नवी दिल्ली व आता प्राचार्य, डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालय व परिसर संचालक, डॉ. उल्हास पाटील कृषी व संबंधित शिक्षण परिसर, जळगांव. उल्लेखनिय कार्य : विदर्भातील ३४ तालुका ठिकाणांची मागील ३० ते ५० वर्षाच्या माहितीवर आधारित सर्वसाधारण प्रति दिवस पावसाची माहिती. ‘विदर्भाचे कृषी हवामान वगीर्र्करण’ या पुस्तकाचे लिखाण व प्रकाशन (पायोनियर वर्क). कृषी हवामान शास्त्र व पाऊस या विषयावर एकूण १९ टेक्निकल बुलेटीन चे इन हाऊस (विद्यापीस्तर) प्रकाशन. विविध विषय व पिकांवरील ५२ शोध निबंध राष्ट्रीय व आंतर राष्ट्रीय स्तरावर प्रसिध्द हवामान आधारित कृषी सल्ला सेवा योजना सतत १० वर्ष यशस्वीपणे राबवून शेतकर्यांना मार्गर्शन.कोरडवाहू शेतकर्यांसाठी मृद व जल संधारण यावर आधिरित विविध शिफारशींना राज्य स्तरावर मान्यता व केंद्रस्तरावर दखल.कृषी शिक्षण, संशोधन व विस्तार अशा तिन्ही क्षेत्रांमध्ये, कृषी विद्यापीठात, ३५ वर्षे सेवा.सन २००७ मध्ये हिमाचल प्रदेश सरकारच्या कृषी विभागातील एका महत्वाकांक्षी प्रकल्पामधील एक सल्लागार म्हणून काही महिने विशेष सेवा.‘कृषि हवामान शास्त्राची ओळख’ ही सर्वसामान्यांसाठी लिहिलेली तांत्रिक पुस्तिका. कदाचित संपूर्ण भारतात, राज्याच्या स्थानिक भाषेमध्ये झालेला हा पहिलाच प्रयत्न असावा. पुरस्कार :- सन २००३ मध्ये भारतातील ‘सर्वोकृष्ट कृषी हवामान शास्त्रज्ञ’ म्हणून ‘राष्ट्रीय पुरस्कार’.ऑस्ट्रिया या देशातील हवामान उपकरणे उत्पादित करणार्या कंपनी व्दारे सर्वोत्कृष्ट भारतीय कृषी हवामान शास्त्रज्ञ म्हणून पुरस्कार (२००३).सन २०१४ मध्ये अखिल भारतीय जय किसान फार्मर्स फोरम या संस्थेकडून डॉ. पंजाबराव देशमुख कृषी गौरव “राष्ट्रीय कृषी रत्न” पुरस्कार. दि. २३ जुलै, २०१६ रोजी नवी दिल्ली येथे इंटरनॅशनल बिझीनेस कौन्सिल नवी दिल्ली तर्फे कृषी शिक्षण विभागासाठी “भारत गौरव” पुरस्कारानेही त्यांना सन्मानित करण्यात आले.