• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा राज्यमंत्र्यांच्या हस्ते राष्ट्रीय बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेचे होणार उद्घाटन..!

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 30, 2025
in जैन कंपनी, 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, नवी दिल्ली, भारत, महाराष्ट्र, मुंबई, विश्व
0
केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा राज्यमंत्र्यांच्या हस्ते राष्ट्रीय बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेचे होणार उद्घाटन..!

पाच वर्षीय वल्लभ कुलकर्णीसह भारतीय वंशाचे विदेशी खेळाडू स्पर्धेचे केंद्रबिंदू

जळगाव ( प्रतिनिधी ) –  जैन हिल्समधील अनुभूती मंडपम् या ठिकाणी होणाऱ्या ३८ व्या राष्ट्रीय बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेचे उदघाटन केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्याहस्ते होणार आहे. त्यांच्यासमवेत जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. चे अध्यक्ष तथा अखिल भारतीय बुद्धिबळ संघटनेचे सल्लागार अशोक जैन, जिल्हा बुद्धिबळ असोसिएशनचे व जैन स्पोर्टस अॅकडमीचे अध्यक्ष अतुल जैन, ग्रॅण्डमास्टर अभिजीत कुंटे, महाराष्ट्र बुद्धिबळ असोसिएशनचे सचिव निरंजन गोडबोले असतील.

३८ व्या राष्ट्रीय बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन २ ते ८ ऑगस्ट २०२५ दरम्यान जळगाव येथील जैन हिल्स परिसरातील अनुभूती मंडपम् येथे होईल. जळगाव शहरात पहिल्यांदाच भव्य स्वरूपात होणाऱ्या बुद्धिबळ स्पर्धेत ५५० च्यावर खेळाडूंनी सहभाग घेतला आहे. विविध राज्यांतील फिडे मानांकन प्राप्त ४०० खेळाडूंचा समावेश यात समावेश आहे. त्यात प्रथम मानांकित पुण्याचा अद्विक अग्रवाल (२२५१), मुलींमध्ये केरळची देवी बीजेस (१८६९) यांच्यासह अनेक खेळाडू हे आशियाई व जागतिक स्पर्धांमध्ये सहभाग घेतलेले अनेक खेळाडू यात आहे. या स्पर्धेत छत्रपती संभाजीनगर येथील वल्लभ अमोल कुलकर्णी (वय ५ वर्ष) या चिमुकल्याने सहभागी झाला आहे. त्याचा खेळ स्पर्धेचे आकर्षण ठरु शकतो. यात भारतीय वंशाच्या काही विदेशी खेळाडूसुद्धा बुद्धिबळाच्या पटावर आपल्या चाली खेळणार आहेत.

या स्पर्धेचे मुख्य आकर्षण म्हणजे पहिले प्रत्येकी सर्वोच्च सहा सामने डिजिटल बोर्डवर लाईव्ह खेळविले जातील. ११ फेऱ्यांमध्ये २७५ बुद्धिबळ पटांवर  भव्य स्वरूपात ही स्पर्धा रंगणार आहे. ११ वर्षांखालील मुलं-मुलींच्या ३८ व्या राष्ट्रीय स्पर्धेत ८ लाखाची बक्षिसे आहेत. वैयक्तीक स्वरुपाचे विजयी, पराजित व बरोबरीत असणाऱ्या सर्व खेळाडूंना रोख स्वरूपात पारितोषिके त्यांच्या खेळाच्या मुल्यांकनानुसार दिले जाणार आहेत. अशा प्रकारची बक्षिसे फक्त जळगावातून जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. च्या माध्यमातून दिली जातात. जळगाव जिल्हा बुद्धिबळ असोसिएशन व जैन स्पोर्ट्स अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच महाराष्ट्र राज्य बुद्धिबळ संघटनेच्या मान्यतेने व अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघ यांच्या मार्गदर्शनात होत असून जैन इरिगेशन सिस्टम्स लिमिटेड या आंतरराष्ट्रीय कंपनीने ही स्पर्धा प्रायोजित केली आहे.

Tags: #jalgaon jain company news #maharashtraकेंद्रीय युवक कल्याण व क्रीडा राज्यमंत्र्यांच्या हस्ते राष्ट्रीय बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेचे होणार उद्घाटन..!
Previous Post

विषारी औषध प्राशन केल्याने तरूणाचा उपचारादरम्यान मृत्यू

Next Post

शानबाग विद्यालयातील विद्यार्थ्यांनी घेतला ‘गाईड’ एकांकिकेचा भावस्पर्शी अनुभव

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
शानबाग विद्यालयातील विद्यार्थ्यांनी घेतला ‘गाईड’ एकांकिकेचा भावस्पर्शी अनुभव

शानबाग विद्यालयातील विद्यार्थ्यांनी घेतला ‘गाईड’ एकांकिकेचा भावस्पर्शी अनुभव

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

तरसोद फाटा येथे एचडीएफसी बँकेत चोरीचा प्रयत्न; सायरन वाजताच चोरटे पसार
1xbet russia

तरसोद फाटा येथे एचडीएफसी बँकेत चोरीचा प्रयत्न; सायरन वाजताच चोरटे पसार

July 21, 2026
मध्य प्रदेशातील उमर्टी येथे जळगाव पोलिसांची धडक; ३२ वाहने, देशी कट्टे आणि शस्त्रनिर्मितीचा साहित्यसाठा जप्त
क्राईम

मध्य प्रदेशातील उमर्टी येथे जळगाव पोलिसांची धडक; ३२ वाहने, देशी कट्टे आणि शस्त्रनिर्मितीचा साहित्यसाठा जप्त

July 21, 2026
तरुणाची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या
1xbet russia

तरुणाची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या

July 20, 2026
गायत्रीनगर परिसरात ६० वृक्षांचे रोपण; LNS हायस्कूलच्या ‘८८ बॅच’चा पर्यावरण संवर्धनाचा स्तुत्य उपक्रम
1xbet russia

गायत्रीनगर परिसरात ६० वृक्षांचे रोपण; LNS हायस्कूलच्या ‘८८ बॅच’चा पर्यावरण संवर्धनाचा स्तुत्य उपक्रम

July 20, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

तरसोद फाटा येथे एचडीएफसी बँकेत चोरीचा प्रयत्न; सायरन वाजताच चोरटे पसार

तरसोद फाटा येथे एचडीएफसी बँकेत चोरीचा प्रयत्न; सायरन वाजताच चोरटे पसार

July 21, 2026
मध्य प्रदेशातील उमर्टी येथे जळगाव पोलिसांची धडक; ३२ वाहने, देशी कट्टे आणि शस्त्रनिर्मितीचा साहित्यसाठा जप्त

मध्य प्रदेशातील उमर्टी येथे जळगाव पोलिसांची धडक; ३२ वाहने, देशी कट्टे आणि शस्त्रनिर्मितीचा साहित्यसाठा जप्त

July 21, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!