तरुणांनी सहभागी होण्याचे रोजगार विभागाचे आवाहन
जळगाव (प्रतिनिधी) – जिल्हयातील युवक-युवतींच्या मागणीवर आधारित कौशल्य प्रशिक्षण पुरविण्यासाठी कौशल्याची मागणी सर्व्हेक्षण मोहिमेचे १ जुलै ते ३१ जुलै दरम्यान आयोजन करण्यात आले आहे. या मोहिमेत सहभागी होण्यासाठी युवक-युवतींनी गुगल लिंक द्वारे नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त वि.जा.मुकणे यांनी केले आहे.
प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियान व किमान कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम यासह केंद्र व राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी योजनांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी. याकरिता जिल्ह्यातील युवक-युवतींना आवश्यक असलेले आणि त्यांनी मागणी केलेले कौशल्य प्रशिक्षण प्रदान केल्यास उमेदवारांच्या प्रशिक्षणा दरम्यान स्वारस्यामध्ये वृध्दी होऊन प्रशिक्षणाअंती यशस्वी उमेदवारांना रोजगार-स्वयंरोजगाराच्या अधिक प्रमाणात संधी उपलब्ध होतील. या मोहीमेंतर्गत सव्हेक्षणासाठी गुगल फॉर्म तयार करण्यात आला आहे. गुगल फॉर्म लिंक http://bit.ly/Student_Skill_Need_Assessment च्या माध्यमातून उमेदवारांनी नोंदणी करावी. असे आवाहन मुकणे यांनी केले आहे.