नमाज पठण करून अल्लाहचे आभार
जळगाव ;- मेहरुनमधील त्या कोरोना बाधित रुग्नाचे नातलग व संपर्कातील 23 जणांसह प्रलंबित सर्व 27 संशयितांचे अहवाल निगेटिव्ह आले असल्यामुळे जळगाव शहरासह जिल्हावासियांना मोठा दिलासा मिळाला आहे. यामध्ये जामनेरातील नातेवाईकांचा ही समावेश आहे.
सर्व समाजाने व खास करून मनियार बिरदारिने नमाज अदा करून अल्लाहचे आभार मानले.
तसेच दुआँ (प्राथना) केली की, ह्या आजारापासून जे आजारी आहेत त्यांना बरे करो व या आजार चे नामो निशान सम्पूर्ण जगातुन नेस्त नाबूत हो. बिरदारीचे अध्यक्ष फारूक शेख यांनी मेहरून वासियासह जळगाव शहर व जिल्ह्यातील सर्व समाज बाधवाना विनंती केली आहे की शासनाने ठरविलेले नियमांचे काटेकोरपणे पालन करा अहवाल नेगेटिव आले म्हणून अतिशयोक्ति करू नका. अल्लाहचे आभार दोन रकात नमाज पढून करण्यात आले. त्यात फारूक शेख, सलीम मोहम्मद, साबीर सैयद व अब्दुल रउफ यांचा समावेश होता.
दुआँ सलीम मोहम्मद यांनी पठन केली.