एक हजारपेक्षा अधिक रुग्णांवर यशस्वी उपचार
जळगाव (प्रतिनिधी) – कोरोनाच्या वैश्विक महामारीमध्ये लोकांमध्ये भीतीचे वातावरण असतांना माजी मंत्री गिरीश महाजन यांच्या जी.एम. फौंडेशन कोविड केअर सेंटरने लोकांच्या मनातील भीती काढण्यात यश मिळवले आहे. राज्यात लक्षवेधी ठरलेल्या या कोविड सेंटरने कोविड रुग्णांची मने जिंकली आहे.
या कोविड सेंटरमध्ये सकाळी योगा, दिवसभरात मनोरंजनाचे कार्यक्रम, यामुळे हे कोविड सेंटर राज्यात लक्षवेधी ठरले असून या कोविड सेंटरमध्ये असलेला नम्र वैद्यकीय स्टाफ, सिस्टर, स्वयंसेवक यांची सेवा लोकप्रिय ठरत आहे. लोकांचा या सेंटरमध्ये उपचार घेण्यासाठी कल असून आज ७५ टक्के रुग्ण उपचार घेत आहे. सदरचे कोविड सेंटर हे खाजगी असले तरी विनामूल्य आहे. राज्यभरात या कोविडसेंटरचे कौतुक होत असून आमदार महाजन यांच्या कार्याची प्रशंसा होत आहे. आतापर्यंत ११०० रुग्ण कोरोनमुक्त झालेले आहे.