जळगाव : जळगाव जिल्ह्यात चार महिन्यानंतर प्रथमच शुन्य मृत्यूचा दिवस उजाळला आहे. यापुर्वी 19 फेबुवारी 2021 पासून तर, आतापर्यंत दररोज कोरोना रुग्णांचे मृत्यू होत असल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले होते. त्यानंतर जिल्ह्यातील मृत्यूदर कमी कमी होत असून रविवारी एक ही रुग्णांचा मृत्यू न झाल्याने सर्वांना दिलासा मिळाला आहे.
जळगाव जिल्ह्यात रविवारी 48 नवीन रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह झाले असून 117 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आतापर्यंत 1,41,934 रुग्ण कोरोना बाधित झाले असून त्यापैकी 1,38,001 रुग्णांनी कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच सध्या 938 रुग्ण होम आयसोलेशनमध्ये उपचार घेत असून 28 रुग्ण शासकीय कोविड केअर सेंटरमध्ये उपचार घेत आहेत. तसेच 222 रुग्ण ऑक्सिजनवर आहे तर,85 रुग्ण अतिदक्षता विभागात दाखल असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झाली आहे. रविवारी नवीन बाधित झालेले रुग्ण पुढील प्रमाणे जळगाव शहर 5, जळगाव ग्रामीण 2, भुसावळ 1, अमळनेर 3, चोपडा 2, पाचोरा 2, भडगाव 2, धरणगाव 3, यावल 3, एरंडोल 3, जामनेर 3, रावेर 4, पारोळा 3,चाळीसगाव 6, मुक्ताईनगर 1 असे एकुण 48 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.