कोळंबा येथे राहत्या घरी घेतला गळफास; चोपडा ग्रामीण पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद
चोपडा : तालुक्यातील कोळंबा येथे २५ वर्षीय विवाहित महिलेने राहत्या घरी गळफास घेतल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली. याप्रकरणी चोपडा ग्रामीण पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ललिता विजय कोळी (वय २५, रा. बुधगाव, ता. चोपडा, सध्या कोळंबा, ता. चोपडा) यांनी कोळंबा येथील वडिलांच्या राहत्या घरी गळफास घेतला. ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना तातडीने उपजिल्हा रुग्णालय, चोपडा येथे दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले.
घटनेची माहिती उपजिल्हा रुग्णालयातील सीएमओ डॉ. सुरेश पाटील यांनी पोलिसांना फोनद्वारे दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी व रुग्णालयात आवश्यक कार्यवाही केली.
या घटनेची चोपडा ग्रामीण पोलिस ठाण्यात पोस्टे अकस्मात मृत्यू क्रमांक ४२/२०२६ अन्वये भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ मधील कलम १९४ प्रमाणे नोंद करण्यात आली आहे.









