अमळनेर ;- जगभरात कोरोना आजाराने थैमान घातले असून हजारो लोकांचे प्राण घेतले आहेत. या आजाराचा प्रार्दुभाव वाढू नये. म्हणून केंद्र व राज्य सरकारने २१ दिवसांसाठी संपूर्ण देश व राज्य लॉकडाऊन केले आहे. तश्यातच मुंबई व पुणे यासह बाहेरगावी कामानिमित्त गेलेले नागरिक आपल्या गावाकडे परतले आहेत. त्यांची माहिती प्रशासनाला कळविणे,त्यांना सक्तीने होम क्वारंटाईन करणे, त्यांना शिक्का मारणे, संशयित व्यक्तिबाबत माहिती देणे.अशी सर्व कामे अमळनेर नागरी विभागातील अंगणवाडी सेविका व आशा स्वयंसेविका यांच्यासह आरोग्य विभागाचे कर्मचारी आपला जीव मुठीत घेऊन करीत आहेत. पैलाड भागात बाहेर गावाहून आलेल्या व्यक्तींची माहिती घेतांना अंगणवाडी सेविका सौ.उषा रामकृष्ण पाटील, आशा स्वयंसेविका प्रतिभा साबे यांनी बाहेरगावाहून आलेल्या व्यक्तींना शिक्के मारले .