जळगाव [प्रतिनिधी] – सेंटीग काम करणाऱ्या मजूराने राहत्या घरात मध्यरात्री गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी ७ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
नातेवाईकांकडून मिळालेली माहिती अशी की, एकनाथ सुरेश शिंपी (वय-४०) रा. हरीविठ्ठल नगर हे आईसह राहतात. एकनाथ शिंपी हे बांधकाम सेंटींगचे काम करतात. विवाहित असून कौटुंबिक वादामुळे पत्नी मुलासह शिरपूर येथे माहेरी राहतात. कौटुंबिक वादामुळे ते काही वर्षापासून तणावात व नैराश्येत होते व त्यांना दारूच्या आहारी गेले. बुधवारी रात्री आईसोबत जेवण करून झोपले. आई पुढच्या खोली झोपलेली असतांना एकनाथ शिंपी यांनी मध्यरात्री मागच्या खोलीत जावून छताला दोरी गळफास घेवून आत्महत्या केली. मुलाने गळफास घेतल्याचा प्रकार सकाळी आईच्या लक्षात आला. तातडीने जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकिय अधिकारी यांनी मृत घोषीत केले. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास पोहेकॉ सतिश डोलरे, पो.कॉ. हरीष डोईफोडे करीत आहे.