तरुण उमेदवाराकडे मतदारांचा वाढता कल
जळगाव (प्रतिनिधी) : काही महिन्यांवर आता लोकसभा निवडणूक देशभरात लागणार आहे. त्याकरिता जळगाव जिल्ह्यातील दोन्ही मतदारसंघात इच्छुक उमेदवारांनी शड्डू ठोकला असून तयारी सुरु केली आहे. रावेर लोकसभा मतदारसंघात डॉ. केतकीताई उल्हास पाटील यांनीही तयारी सुरु केल्याचे दिसून आले आहे. त्याकरिता त्यांनी मतदारसंघातील विविध गावांमधील दौरे पूर्ण केले असून सर्व वयोगटातील व्यक्तींशी संवाद साधत आहेत. तसेच, विविध शिबिरांच्या माध्यमातून वैद्यकीय सेवादेखील कायम ठेवली आहे. एकंदरीत खासदारकीच्या तयारीत केतकीताई पास झाल्या असून त्यांचे दौरे सुरूच आहेत.
रावेर लोकसभा मतदारसंघात रावेर, यावल, चोपडा, जामनेर, बोदवड, भुसावळ, मुक्ताईनगर, मलकापूर, नांदुरा हे ९ तालुके येतात. या ९ तालुक्यात १७०० च्यावर गावे येतात. तर यावल, मलकापूर, नांदुरा, चोपडा, भुसावळ, बोदवड, सावदा, फैजपूर, रावेर, जामनेर अशा नगरपालिका येतात. या सर्व बाबींचा विचार करता, डॉ. केतकी पाटील यांना आतापासूनच अभ्यास करावा लागणार आहे. त्यानुसार ते कामाला लागले असून भेटीगाठी घेत आहेत. त्यांनी ४०० पेक्षा अधिक गावात जाऊन शेतकऱ्यांची, युवक व महिलांशी संवाद साधत आहेत. विविध आंदोलनांना जाऊन भेटी घेत आहेत. त्यांनी पोलिसांसाठी मानसिक आरोग्य उपक्रम घेतला होता. पूरग्रस्त नागरिकांच्या भेटी घेऊन त्यांचे सांत्वन केले होते. विविध वैद्यकीय शिबीर ते मतदारसंघात घेत आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा “मेरी माटी, मेरा देश” हा उपक्रम रावेर मतदारसंघात सर्वात प्रथम डॉ. केतकी पाटील यांनी घेतला आहे. अनेक गावांत वृक्षारोपण केले जात असून आतापर्यंत ५०० च्यावर वृक्षारोपण झालेले आहेत. डॉ. केतकी पाटील यांनी संवाद साधून नागरिकांच्या अडचणी समजून घेत आहेत. सध्या ते अधिकृतपणे कुठल्याच पक्षात नाहीत. त्यांचे वडील डॉ. उल्हास पाटील हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे माजी खासदार असून सध्या प्रदेश उपाध्यक्ष आहेत. डॉ. केतकी पाटील मात्र कोणत्या पक्षाकडून लढतील हे मात्र गुलदस्त्यात आहे.