जळगावातील शिवाजीनगर, दूध फ्रेडरेशन,जवळील घटना
जळगाव (प्रतिनिधी) – जळगाव शहर पोलिस स्टेशनच्या हद्दीत असणार्या दूध फ्रेडरेशन, बौद्ध विहार जवळ एका चिकनच्या गाडी जवळ 45 वर्षीय तरुणाचा निर्घृण खून झाला. काल सोमवारी 5 ऑक्टोबर रोजी रात्री अकरा वाजेच्या सुमारास घटना घडली.याबाबत शहर पोलिस स्टेशनला खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित आरोपीला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांकडून घटनेबद्दल मिळालेली माहिती अशी की, हरिश्चंद्र उर्फ काल्या मंगल अटवाल (वय 31 ) रा.इंद्रप्रस्त नगर जळगाव आणि अरुण हरी पवार (वय 45 )रा. केसी पार्क ,कानळदा रोड ,जकात नाक्याच्या माघे शिवाजीनगर ,जळगाव हे दोघे मित्र आहेत. काल रात्री चिकनच्या गाडी जवळ दारू आणायची आहे, मला मोटरसायकल दे असे संशयित आरोपी हरिश्चंद्र उर्फ काल्या मंगल अटवाल याने अरुण हरी पवार याला सांगितले. मात्र मोटरसायकल द्यायला अरुण पवारने हरिश्चंद्रला नकार दिला. त्यामुळे त्याचा राग येऊन अरुण पवार याला लाता बूक्यांनी मारहाण करुन डोक्यात हरिश्चंद्रने फरशी मारली. त्यामध्ये तो गंभीर स्वरूपात जखमी झाला. त्याला उपचारासाठी देवकर कॉलेजच्या प्रांगणात असलेल्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. दरम्यान याप्रकरणी जळगाव शहर पोलिस स्टेशनच्या पथकाने तात्काळ हरिश्चंद्चा शोध घेऊन त्याला अटक करण्यात आली आहे. अरुण हरी पवार यांच्या पत्नी फिर्यादी रत्नाबाई अरुण पवार वय 34 यांच्या फिर्यादीवरून गुरन. 168/2020 भाग 5 भादवी कलम 302,323,504 , प्रमाने खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक अरुण निकम करीत आहे. आज पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हरिश्चंद्र उर्फ काल्या अटवाल याच्यावर यापूर्वी पण गुन्हे दाखल आहे.
जळगाव शहरात पुन्हा एकदा कायदा-सुव्यवस्था बद्दल शहरात प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.