• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

किशोर सोनवणे खूनप्रकरणी चार संशयीतांना अटक, इतरांच्या मागावर पोलीस पथके रवाना

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 23, 2024
in क्राईम, जळगाव
0
किशोर सोनवणे खूनप्रकरणी चार संशयीतांना अटक, इतरांच्या मागावर पोलीस पथके रवाना

खुनाच्या घटनेमुळे जळगावात भयाचे वातावरण

जळगाव (प्रतिनिधी) शहरातील कालिका माता मंदिर परिसरातील हॉटेल भानू येथे बुधवारी दि. २२ मे रोजी रात्री नऊ ते दहा वाजेच्या सुमारास किशोर अशोक सोनवणे या तरुणाच्या खून प्रकरणी शनिपेठ पोलिसांनी चार संशयित आरोपींना अटक केली आहे. तर इतर संशयित आरोपींच्या मागावर पथके रवाना करण्यात आली आहे. दरम्यान खुनाच्या घटनेमुळे जळगावात अजूनही भयाचे वातावरण आहे.

अशोक श्रावण सोनवणे (वय ६०, रा. प्रबोधन नगर, हॉटेल साई पॅलेसच्या मागे,जळगाव) यांनी फिर्याद दिली आहे. ते रिक्षा चालवून परिवाराचा उदरनिर्वाह करतात. पत्नी लताबाई, मुलगा किशोर, सून काजल आणि नात दिव्यांशी यांच्यासोबत राहतात. त्यांना बुधवार दि. २२ मे रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास मुलगा किशोर याचा मित्र अमोल सोनार उर्फ गप्या याचा फोन आला. त्याने सांगितले की, हॉटेल भानू, कालिका माता मंदिराजवळ येथे कीशोरला काही जणांनी मारहाण केली आहे व त्यात तो बेशुद्ध झाला आहे. आणि त्याला सिव्हिल हॉस्पिटल येथे घेऊन चाललो आहोत. त्यानंतर फिर्यादी अशोक सोनवणे हे त्यांच्या परिवारासह सिव्हिल हॉस्पिटल येथे गेले. तेथे त्यांना कीशोरच्या मित्रांनी हकीगत सांगितली.

रात्री ८ वाजता अमोल सोनार उर्फ गप्या यांच्या घराजवळ किशोर सोनवणे आणि त्याचे पाच ते सहा मित्र हे गप्पा मारत उभे होते. त्यावेळेला त्यांनी हॉटेल भानू येथे जेवायला जाण्याबाबत प्लॅन बनवला. रात्री ९ वाजता ते हॉटेल भानू येथे जेवणासाठी गेले. थोड्या वेळात किशोर सोनवणे याला कोणाचा तरी फोन आला. फोन घेऊन तो बाहेर गेला. बाहेर एका चायनीजच्या गाडीवरील रुपेश काकडे नामक तरुणाशी त्याचा वाद झाला. अमोल सोनार उर्फ गप्या आणि त्याच्या मित्रांनी तो वाद सोडवून त्याला पुन्हा हॉटेल भानू येथे घेऊन आले. तेथे आम्ही जेवण करीत असताना दहा ते अकरा जण आलेत.

त्यांनी किशोर सोनवणे याला धरून धारदार शस्त्राने आणि लोखंडी दांड्याने मारहाण करण्यास सुरुवात केली. तसेच त्याला ओढत ओढत हॉटेलच्या दरवाजेपर्यंत आणले आणि तिथून पळून गेले. अमोल सोनार व त्याच्या मित्रांनी पाहिले तर किशोर सोनवणे बेशुद्ध झाला होता. त्याला उचलून तातडीने त्यांनी सिव्हिल हॉस्पिटल येथे आणले. तेथे डॉक्टरांनी त्याला मयत घोषित केले होते. त्यानंतर किशोरचे वडील अशोक सोनवणे यांनी शनिपेठ पोलीस स्टेशनला येऊन फिर्याद दाखल केली आहे.

 

https://kesariraj.com/wp-content/uploads/2024/05/VID-20240523-WA0021.mp4

त्यानुसार संशयित आरोपी रुपेश मनोहर सोनार, निलेश उर्फ लोमेश युवराज सपकाळे, आकाश युवराज सपकाळे, मयूर विनोद कोळी, ईश्वर सुभाष काकडे, रुपेश सुभाष काकडे (सर्व रा. मोहन टॉकीज परिसर, आसोदा रोड, जळगाव), दुर्लभ कोळी (सुनसगाव ता. जळगाव) आणि अमोल छगन सोनवणे (श्रीराम कॉलनी, जळगाव) यांच्यासह अनोळखी तीन इसम यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शनिपेठ पोलिसांनी आणि एलसीबी पोलिसांनी कसून तपास केला. यामधील चार संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे.

त्यामध्ये प्रशांत सुभाष काकडे (वय ३०), रुपेश सुभाष काकडे (वय २७), ईश्वर सुभाष काकडे (वय २३), मयूर विनोद कोळी ( वय २१, सर्व रा. आसोदा रोड, मोहन टॉकीज जवळ, जळगाव) यांना अटक करण्यात आलेली असून त्यांची विचारपूस सुरू आहे. दरम्यान खुनाच्या खळबळजनक घटनेमुळे जळगाव हादरले आहे. पुढील तापास सुरू आहे


 

 

Previous Post

जळगाव शहरात पुन्हा खळबळ, चॉपरने वार करून तरुणाचा खून

Next Post

नशिराबाद येथे खड्डे, आसाऱ्यांमुळे ग्रामस्थांना जीवघेणे त्रास

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
नशिराबाद येथे खड्डे, आसाऱ्यांमुळे ग्रामस्थांना जीवघेणे त्रास

नशिराबाद येथे खड्डे, आसाऱ्यांमुळे ग्रामस्थांना जीवघेणे त्रास

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

संघर्षात सुद्धा ‘निर्भय’ रहा – ज्ञानपीठ पुरस्कार विजेते दामोदर मावोजो
जैन कंपनी

संघर्षात सुद्धा ‘निर्भय’ रहा – ज्ञानपीठ पुरस्कार विजेते दामोदर मावोजो

September 21, 2026
गणेश विसर्जनाला जाण्यास वडिलांचा नकार; १२ वर्षीय मुलाने उचले टोकाचे पाऊल
1xbet russia

गणेश विसर्जनाला जाण्यास वडिलांचा नकार; १२ वर्षीय मुलाने उचले टोकाचे पाऊल

September 21, 2026
रौप्य महोत्सवी वर्षात ‘पिंप्राळ्याचा राजा’ची पर्यावरणपूरक मूर्ती; २५ वर्षांची समाजसेवेची परंपरा कायम
1xbet russia

रौप्य महोत्सवी वर्षात ‘पिंप्राळ्याचा राजा’ची पर्यावरणपूरक मूर्ती; २५ वर्षांची समाजसेवेची परंपरा कायम

September 21, 2026
रावेरमध्ये बंद घर फोडून साडेतीन लाखांचा ऐवज लंपास
1xbet russia

रावेरमध्ये बंद घर फोडून साडेतीन लाखांचा ऐवज लंपास

September 21, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

संघर्षात सुद्धा ‘निर्भय’ रहा – ज्ञानपीठ पुरस्कार विजेते दामोदर मावोजो

संघर्षात सुद्धा ‘निर्भय’ रहा – ज्ञानपीठ पुरस्कार विजेते दामोदर मावोजो

September 21, 2026
गणेश विसर्जनाला जाण्यास वडिलांचा नकार; १२ वर्षीय मुलाने उचले टोकाचे पाऊल

गणेश विसर्जनाला जाण्यास वडिलांचा नकार; १२ वर्षीय मुलाने उचले टोकाचे पाऊल

September 21, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon