भुसावळ शहरातील घटना
भुसावळ : घराबाहेर खेळण्यासाठी बाहेर पडलेला १४ वर्षीय अल्पवयीन मुलगा घरी न परतल्याने बाजारपेठ पोलिसात अज्ञाताविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. जयेश चेतन वाघोदे (रा. शिवपूर कन्हाळा रोड, समर्थ कॉलनी, भुसावळ) असे अपहरण झालेल्या बालकाचे नाव आहे.
संदीप शंकर वाघोदे यांच्या तक्रारीनुसार बाजारपेठ पोलिसाता अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संदीप यांचा पुतण्या जयेश हा १० रोजी रात्री नऊ वाजता खेळण्यासाठी बाहेर पडला. मात्र बराच वेळ होऊनही तो घरी न आल्यानंतर त्याचा शोध सुरू करण्यात आला. मात्र मुलाबाबत काहीही तपास न लागल्याने त्याचे अपहरण झाल्याचा संशय आल्यावरून बाजारपेठ पोलिसात फिर्याद देण्यात आली पोलिस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक अमितकुमार बागुल हे तपास करीत आहेत.