मुंबई (वृत्तसंस्था ) माजी मंत्री एकनाथराव खडसे यांना ईडीने ८ रोजी सकाळी ११ वाजता हजर राहण्याचे समन्स काढले असून एकनाथराव खडसे हे मुंबईतील नवीन राष्ट्रवादी भवन येथे पत्रकारांशी संवाद साधणार आहे. दरम्यान ईडीने भोसरी जमीन प्रकरणी एकनाथराव खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना अटक केली असून आता ईडीने एकनाथराव खडसे यांना हजर राहण्याचे समन्स बजावले असल्याने याकडे जिल्ह्यासह राज्याचे लक्ष लागले आहे.