• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

पाचोरा येथे अवतरले काशीचे विश्वेश्वरनाथ मंदिर

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 31, 2022
in खान्देश, जळगाव
0

पाचोरा(प्रतिनिधी ) – येथे यंदाच्या गणेशोत्सवात मोक्षभूमी असलेल्या काशीच्या विश्वेश्वर नाथांच्या मंदिराची प्रतिकृती साकारली असून बंगाली कारागिरांच्या अथक परिश्रमातून आमदार किशोर पाटील यांचे पुत्र सुमित पाटील यांच्या कल्पकतेतून ही आरास साकारण्यात आल्याने भाविकांना खऱ्या अर्थाने येथे दर्शन घेऊन काशी केल्याचे आत्मिक समाधान लाभणार असल्याने भाविकांचे आकर्षण वाढले आहे .

मानसिंगका मिलच्या प्रांगणात आमदार किशोर पाटील यांच्या प्रेरणेने सुमित पाटील यांनी काशीच्या विश्वेश्वरनाथ मंदिराची प्रतिकृती साकारण्याचा निर्णय घेतला त्यासाठी बंगाली कारागिरांची मदत घेण्यात आली .गेल्या दीड महिन्यांपासून सुरज तिवारी यांच्या मार्गदर्शनाखाली वीस बंगाली कारागरांचा जमू या जगप्रसिद्ध मंदिराची प्रतिकृती येथे साकारत आहेत.

देशातील प्रत्येक नागरिकाला काशी या पुण्यभुमीतील तीर्थक्षेत्रास जावेसे वाटते. काशी केल्याने जीवनात मोक्ष मिळतो अशी धार्मिक श्रद्धा असल्याने परंतु अनेकांना आर्थिक अथवा इतर कारणांमुळे काशी जाणे शक्य होत नाही त्यामुळे आपणच पांडव व भगवान श्रीकृष्णाच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या पाचोरा पुण्यभूमीत काशीच्या विश्वेश्वर नाथांच्या मंदिराची प्रतिकृती साकारावी या निर्धारात्मक संकल्पनेतून सुमित पाटील यांनी हा उपक्रम येथे राबवला आहे. सुमित पाटील यांनी याउपक्रमाच्या माध्यमातुन आपले कौटुंबिक ,धार्मिक व सांस्कृतिक संस्कार वृद्धिंगत केले आहेत. अंतुर्ली येथील पाटील कुटुंबीय गेल्या तीन पिढ्यांपासून विविधांगी धार्मिक व सांस्कृतिक क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.

याच कुटुंबातील सुमित पाटील यांनी आपला हा कौटुंबिक वारसा वृद्धिंगत करण्याच्या हेतूने पाचोरा येथे काशीच्या विश्वेश्वरनाथ मंदिराची प्रतिकृती साकारण्याच्या विचारास मूर्त रूप दिले आहे. मुंबई व्यतिरिक्त असा विश्वेश्वर मंदिराचा भव्य देखावा उत्तर महाराष्ट्रात साकारण्यात आलेला नाही. त्यामुळे उत्तर महाराष्ट्रातील भाविकांना काशी येथील विश्वेश्वरनाथांच्या दर्शनाची अनुभूती व्हावी व त्यांनाही आपण काशी करून मोक्ष मिळवण्याचा आनंद व्हावा व त्यांची काशी केल्याची इच्छा पूर्ण व्हावी या हेतून मंदिराची प्रतिकृती साकारली असून हजारो भाविकांना या निमित्ताने काशीचे दर्शन घडविण्याचे भाग्य मिळाल्याचा आनंद असल्याचे सुमित पाटील यांनी स्पष्ट केले.

गणेशोत्सवाच्या दहा दिवसाच्या काळात दिवसभर हे मंदिर दर्शनासाठी खुले राहील भाविक महिला पुरुषांच्या दर्शनासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली असून ज्या मानसिंगका मिलचा गणपती परिसरात प्रसिद्ध मानला जात होता त्याच ठिकाणी या मंदिराची प्रतिकृती साकारून हा धार्मिक ठेवा कायम ठेवला असल्याचे स्पष्ट केले. भाविकांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन सुमित पाटील, समाधान पाटील यांनी केले आहे.


 

Tags: #pachoranews
Previous Post

आ. किशोर पाटील यांचा कृती समिती संचालक व गट सचिव यांच्यातर्फे सत्कार

Next Post

सामाजिक दायित्व आणि व्यावसायिक हित या मध्ये संतुलनासाठी ‘स्व’ च्या त्रीसूत्रीचा अवलंब आवश्यक

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

सामाजिक दायित्व आणि व्यावसायिक हित या मध्ये संतुलनासाठी 'स्व' च्या त्रीसूत्रीचा अवलंब आवश्यक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन
1xbet russia

५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन

June 20, 2025
क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारकाचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन
1xbet russia

क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारकाचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

June 20, 2025
कोकण किनारपट्टीला उंच लाटांचा इशारा, पुण्यात ऑरेंज अलर्ट
1xbet russia

कोकण किनारपट्टीला उंच लाटांचा इशारा, पुण्यात ऑरेंज अलर्ट

June 20, 2025
नाशिक जिल्ह्यातील तरुणाला गावठी कट्ट्यासह अटक
Uncategorized

खत-बियाण्यांचा साठा जप्त,  विनापरवाना कृषी सेवा केंद्रावर भरारी पथकाची धाड

June 20, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन

५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन

June 20, 2025
क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारकाचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारकाचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

June 20, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon