जळगाव (प्रतिनिधी) – बोदवड तालुक्यातील करंजी येथे चौदाव्या वित्त आयोगातून कामे न करता परस्पर साडे सहा लाखांची रक्कम ठेकेदाराकडे वर्ग केल्याने सरपंच जानकीराम पाटील व ग्रामसेविका शिल्पा अंभोरे यांच्यावर कारवाई करावी, या मागणीसाठी उपसरपंच सविता पाटील यांच्यासह दोघांनी जिल्हा परिषदेसमोर उपोषण पुकारले आहे.
गेल्या दोन दिवसांपासून हे उपोषण सुरू असून अधिकार्यांनी मात्र, या उपोषणाची दखल घेतलेली नाही. त्यामुळे संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
सरपंच पाटील व ग्रामसेविका अंभोरे यांनी पाणीपट्टी, दलित वस्ती सुधार योजनेच्या कामांमध्ये घोळ केला आहे. त्यांची चौकशी करण्यासाठी गटविकास अधिकार्यांना निवेदन देऊनही त्यांनी टाळाटाळ केली असून उडवाउडवीची उत्तरे मिळत आहे. तेव्हा याप्रकरणाची चौकशी करून सरपंच पाटील यांनी अपात्र करा व ग्रामसेविका शोभा अंभोरे यांना निलंबीत करा, अशी मागणी सविता पाटील यांच्यासह ज्योती पाटील व उत्तम सुरवाडे यांनी केली आहे. या मागणीसाठी त्यांनी जिल्हा परषिदेसमोर आमदारण उपोषण पुकारले आहे.