पोलीस अधीक्षकांनी केले जागेचे भूमिपूजन
जळगाव (प्रतिनिधी) :- येथील जिल्हा कारागृहात पोलीस अधीक्षक डॉ. एम. राजकुमार यांचे हस्ते भूमिपूजन करण्यात आले. यामुळे नवीन ४ बॅरेक (कैदी ठेवण्याच्या खोल्या) बांधण्याच्या कामाला सुरुवात होणार आहे. भविष्यात कैदी ठेवण्याची क्षमता २०० वरून ३०० ते ३५० होणार असल्याने कारागृह प्रशासनाचा ताण काहीसा हलका होणार आहे.
जळगाव जिल्हा कारागृह येथे शुक्रवारी दि.१३ऑक्टोबर रोजी जिल्हा नियोजन समिती, जळगाव यांचेकडून ७२ लाख रुपये निधी प्राप्त झाला आहे. त्यातून नवीन ४ बॅरेक तयार केल्या जाणार आहे. यात दोन ४० क्षमतेच्या पुरुष बॅरेक, १ महिलांसाठी व १ तृतीयपंथीय कैद्यांसाठीदेखील राखीव करण्यात येणार आहे. कारागृहात सध्या कैद्यांची क्षमता ५०० च्या वर जात आहे. त्यामुळे कैदी ठेवण्याची क्षमतेवर पडणारा ताण कमी करण्यासाठी नवीन ०४ बॅरेक महत्वाच्या ठरतील.
भूमिपूजनवेळी कारागृह अधीक्षक अनिल वांढेकर, तुरुंग अधीक्षक १ गजानन पाटील, तुरुंग अधीक्षक २ एस. पी. कन्वार, सुभेदार, हवालदार, रक्षक, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता महाजन यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.