पारोळा तालुक्यातील वसंत नगर येथील घटना
पारोळा (प्रतिनिधी) : तालुक्यातील वसंतनगर येथे दिनांक १७ जून रोजी रात्री झालेल्या जोरदार पावसामुळे राधेश्याम पूनमचंद जाधव यांच्या घराची भिंत पडल्याने ते जखमी झाले आहेत. त्यांच्यावर उपचार करण्यात आले आहे.
वसंतनगर परिसरात सोमवारी दिनांक १७ रोजी रात्री जोरदार पाऊस झाला होता. राधेश्याम जाधव आपल्या परिवारासोबत घरात झोपलेले होते. रात्री ११ वाजेच्या सुमारास अचानक घराची भिंत कोसळली. त्यात राधेश्याम जाधव यांच्या पायाला व हाताला दुखापत झाली असून त्यांना उपचारासाठी धुळे येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
घरात त्यांची पत्नी, दोन मुले हेही बाजूलाच झोपलेले होते. सुदैवाने इतरांना दुखापत झालेली नाही. तलाठी गीतांजली पाटील, ग्रामसेवक शेखर पाटील, पोलिस पाटील विलास जाधव यांनी पंचनामा केला.