जळगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील कानळदा येथील कण्व ऋषी आश्रमात स्वामी चंद्रकिरण महाराज यांचे मंदिरातील चांदीचा पत्रा लावलेला लाकडी पादुकाचा जोड अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेला. रविवार दिनांक १५ रोजी पहाटे पाच ते सायंकाळी पाच वाजेच्या दरम्यान ही घटना घडली. याप्रकरणी तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कानळदा येथे आश्रमात स्वामी चंद्रकिरण महाराज यांचे मंदीर आहे. याठिकाणी भाविक दर्शनार्थ येत असतात. महाराजांच्या लाकडी पादुकाना अंदाजे ५०० ते ७०० ग्रॅम वजनाचा चांदीचा पत्रा लावलेला होता. या पादुका चोरट्यांनी चोरुन नेल्या. प्रकार उघडकीस आल्यानंतर आश्रम व मंदिरातील पुजारी विनायक कालिदास टेंभरे (वय ३९, रा. कण्व ऋषी आश्रम) यांनी तक्रार दिली. त्यानुसार तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस निरीक्षक महेश शर्मा यांच्यासह कर्मचाऱ्यांनी आश्रमात जावून घटनेची माहिती घेतली. पोलीस हेड कॉन्सटेबल अनिल फेगडे हे तपास करीत आहेत.