जळगाव (प्रतिनिधी)- कांताई बांधार्यात 21 वर्षीय तरुण पाण्यात बुडाल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली असून तरुणाचा शोध सुरु आहे. नातेवाईकांनी याप्रकरणी तालुका पोलिस स्टेशनला माहिती दिली असून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तरुणाचा शोध सुरु केला आहे.
शहरातील पिंप्राळा उपनगरातील मयुर कॉलनी परिसरातील रहिवासी चंद्रकांत अभिमन पाटील यांचा मुलगा आकाश चंद्रकांत पाटील वय -21(एस.वाय.बी.ए.चा विद्यार्थी) हा आपल्या चार ते पाच मित्रासोबत कांताई बांधार्यावर पोहण्यासाठी गेला असता तो पाण्यात बुडाल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी आकाश पाटील याच्या नातेवाईकांनी तालुका पोलिस स्टेशनला सदर घटनेची माहिती दिली. त्यानंतर तत्काळ पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून बुडालेल्या तरुणाचा शोध सुरु आहे.