• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

काळजाचा थरकाप! जामनेरमध्ये स्विमिंग पूलच्या आऊटलेटमध्ये पडून ५ वर्षीय बालकाचा करुण अंत

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 4, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
काळजाचा थरकाप! जामनेरमध्ये स्विमिंग पूलच्या आऊटलेटमध्ये पडून ५ वर्षीय बालकाचा करुण अंत

जामनेर (प्रतिनिधी):- येथील सोनेश्वर मंदिराच्या पायथ्याशी असलेल्या स्विमिंग पूल परिसरात एक अत्यंत हृदयद्रावक घटना घडली आहे. आऊटलेटच्या हौदात पडून कार्तिक उर्फ उत्कर्ष गणेश पाटील या ५ वर्षीय चिमुकल्याचा बुडून मृत्यू झाला. ही घटना रविवारी संध्याकाळी ५ ते ६ वाजेच्या सुमारास घडली असून, यामुळे परिसरात शोककळा पसरली आहे.

नेमकी घटना काय?

मूळचे एकुलती येथील रहिवासी आणि सध्या जामनेर येथील दर्शन पार्क परिसरात स्थायिक असलेले गणेश पाटील हे रविवारी सुटीचा आनंद घेण्यासाठी आपल्या मुलांसह स्विमिंग पूलवर गेले होते. गणेश पाटील हे तोंडापूर येथील एका शिक्षण संस्थेत क्लार्क म्हणून कार्यरत आहेत.

संध्याकाळी पोहण्याचा आनंद घेतल्यानंतर पाटील आपल्या मुलांना घेऊन कपडे बदलण्यासाठी रूममध्ये गेले. याच दरम्यान, छोटा कार्तिक आऊटलेटमधून वाहणारे पाणी पाहण्याच्या ओढीनं पुढे गेला. पाण्याचा आनंद घेण्याच्या नादात त्याचा तोल गेला आणि तो थेट आऊटलेटचे पाणी जमा होणाऱ्या चेंबरमध्ये पडला. चेंबरमध्ये पाणी असल्याने त्यात बुडून त्याचा मृत्यू झाला.

सुरक्षेच्या अभावामुळे घात झाल्याचा आरोप

घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी कार्तिकचा शोध घेण्यासाठी स्विमिंग पूलच्या पाण्यात धाव घेतली. मात्र, सुरुवातीला कोणाचेही लक्ष आऊटलेटच्या चेंबरकडे गेले नाही. बराच वेळ शोध घेतल्यानंतर तो चेंबरमध्ये आढळून आला, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता.

या दुर्घटनेनंतर कंत्राटदाराच्या ढिसाळ कारभारावर संताप व्यक्त केला जात आहे. घटनास्थळी प्रशिक्षित ट्रेनर किंवा सुरक्षा रक्षक तैनात नसल्यामुळेच कार्तिकला वेळेवर मदत मिळू शकली नाही, असा थेट आरोप नागरिकांनी केला आहे. जर तिथे सुरक्षा रक्षक असता, तर कदाचित कार्तिकचा जीव वाचला असता, अशी हळहळ उपस्थित लोकांनी व्यक्त केली.

पाटील कुटुंबावर दुःखाचा डोंगर

मृत कार्तिकच्या पश्चात आई, वडील, ११ वर्षांची मोठी बहीण, आजी-आजोबा आणि काका-काकू असा मोठा परिवार आहे. सुटीचा आनंद घेण्याचे नियोजन असलेल्या पाटील कुटुंबावर या घटनेमुळे दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेमुळे लहान मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

Tags: #jamner crime news #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

महावितरणचा गुणवंत तांत्रिक कामगार पुरस्कार सोहळा थाटात

Next Post

अज्ञात वाहनाच्या धडकेत ८७ वर्षीय वृद्धेचा मृत्यू; धडक देऊन चालक फरार

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
अज्ञात वाहनाच्या धडकेत ८७ वर्षीय वृद्धेचा मृत्यू; धडक देऊन चालक फरार

अज्ञात वाहनाच्या धडकेत ८७ वर्षीय वृद्धेचा मृत्यू; धडक देऊन चालक फरार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ग्वालियर आयडीई बुटकॅम्प मध्ये गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय विद्यार्थ्यांचे यश
1xbet russia

ग्वालियर आयडीई बुटकॅम्प मध्ये गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय विद्यार्थ्यांचे यश

May 4, 2026
पांढरा काविळ असलेल्या दोन रुग्णांवर शिबिरातून मोफत मोतीबिंदूची यशस्वी शस्त्रक्रिया
1xbet russia

पांढरा काविळ असलेल्या दोन रुग्णांवर शिबिरातून मोफत मोतीबिंदूची यशस्वी शस्त्रक्रिया

May 4, 2026
अज्ञात वाहनाच्या धडकेत ८७ वर्षीय वृद्धेचा मृत्यू; धडक देऊन चालक फरार
Uncategorized

अज्ञात वाहनाच्या धडकेत ८७ वर्षीय वृद्धेचा मृत्यू; धडक देऊन चालक फरार

May 4, 2026
काळजाचा थरकाप! जामनेरमध्ये स्विमिंग पूलच्या आऊटलेटमध्ये पडून ५ वर्षीय बालकाचा करुण अंत
1xbet russia

काळजाचा थरकाप! जामनेरमध्ये स्विमिंग पूलच्या आऊटलेटमध्ये पडून ५ वर्षीय बालकाचा करुण अंत

May 4, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

ग्वालियर आयडीई बुटकॅम्प मध्ये गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय विद्यार्थ्यांचे यश

ग्वालियर आयडीई बुटकॅम्प मध्ये गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय विद्यार्थ्यांचे यश

May 4, 2026
पांढरा काविळ असलेल्या दोन रुग्णांवर शिबिरातून मोफत मोतीबिंदूची यशस्वी शस्त्रक्रिया

पांढरा काविळ असलेल्या दोन रुग्णांवर शिबिरातून मोफत मोतीबिंदूची यशस्वी शस्त्रक्रिया

May 4, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!