अनिरुद्ध आयठल
(शास्त्रीय व उपशात्रीय गायन)
खानदेशचा सांस्कृतिक मानदंड म्हणून संपूर्ण भारत वर्षात ख्यातनाम असलेला स्व. वसंतराव चांदोरकर स्मृति प्रतिष्ठान आयोजित व संस्कृती मंत्रालय, नवी दिल्ली, जैन इरिगेशन सिस्टिम्स लि., भारतीय स्टेट बँक, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लि., जळगाव जनता सहकारी बँक, सुहान्स केमिकल्स, जाई काजळ, वेगा केमिकल्स, चांदोरकर टेक्नॉलॉजीज (ओपीसी) प्रा. लि. होस्टिंग ड्युटी, पु .ना. गाडगीळ सन्स लि. प्रायोजित २३ व्या बालगंधर्व संगीत महोत्सवाचे आयोजन दि. ३, ४, ५ जानेवारी २०२५ रोजी करण्यात येत आहे. २६ वर्षे वयाचा उमदा तरुण आश्वासक गायक म्हणून अनिरुद्ध सांगितिक विश्वात प्रसिद्ध होत आहे. वयाच्या ८ व्या वर्षापासून अनिरुद्ध गुरु गीता गरुड पृथ्वीराज यांच्याकडे गायनाचे धडे घडवू लागला. सध्या गेल्या आठ वर्षांपासून अनिरुद्ध डॉ. अशोक हुग्गनवार यांच्याकडे आपले सांगितिक शिक्षण घेत आहे. त्याचे गुरु हे पं. लिंगराज बुवा यारागुप्पी, पं. बसवराज राजगुरू व पं. संगमेश्वर गुरव यांचे शिष्य होते. अनिरुद्ध ने सन २०१७ ची आकाशवाणी संगीत स्पर्धा जिंकली आहे. विद्यापीठ युवक महोत्सवात त्याने अनेकदा सुवर्णपदक प्राप्त केली आहे. त्याचप्रमाणे त्याला सी.सी.आर.टी. शिष्यवृत्ती मिळाली असून आकाशवाणी धारवाडचा अनिरुद्ध A ग्रेड मान्यताप्राप्त कलावंत आहे. भारतातील अनेक शहरांमध्ये तसेच राज्यांमध्ये अनिरुद्ध ने आपली कला सादर केली आहे. अनिरुद्ध एक इंजिनियर असून भारतीय अभिजात संगीताची धुरा तो यशस्वीपणे पुढे नेत आहे. अभिजात संगीता सोबतच उपशास्त्रीय संगीतातही त्याचे सादरीकरण उत्तम असते.
अशा या तरुण आश्वासक युवा गायकाची गायकी ऐकण्याची संधी २३ व्या बालगंधर्व संगीत महोत्सवाच्या निमित्ताने जळगावकर रसिकांना मिळाली आहे. त्याचा त्यांनी लाभ घ्यावा अशी विनंती प्रतिष्ठानच्या विश्वस्तांसह प्रायोजकांनी केली आहे.