• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

 कबडडीत शिवाजी पॉलिटेक्निक सांगोला तर खो.खो मध्ये श्री सिद्धेश्वर महिला पॉलिटेक्निक, सोलापूर विजेते

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
February 13, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
 कबडडीत शिवाजी पॉलिटेक्निक सांगोला तर खो.खो मध्ये श्री सिद्धेश्वर महिला पॉलिटेक्निक, सोलापूर विजेते

गोदावरी तंत्रनकेतन जळगावात स्पर्धा उत्साहात पार पडल्या

जळगाव (प्रतिनिधी):- आंतर अभियांत्रिकी पदविका विद्यार्थी क्रीडा संघटना (आयईडीएसएसए) यांच्या वतीने गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय (तंत्रनिकेतन), जळगाव येथे मुलींच्या राज्यस्तरीय कबड्डी व खो-खो स्पर्धांचे भव्य आयोजन करण्यात आले. दिनांक १२ फेब्रुवारी २०२६ पासून सुरू झालेल्या या स्पर्धा उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरीत्या संपन्न झाल्या.
स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यास जळगाव शहराच्या महापौर दीपमाला काळे प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. यावेळी डॉ. वर्षा पाटील (सचिव, गोदावरी फाउंडेशन), डॉ. पराग पाटील (प्राचार्य, शासकीय तंत्रनिकेतन जळगाव) आणि डॉ. विजयकुमार पाटील (प्राचार्य, गोदावरी तंत्रनिकेतन) हे मान्यवर उपस्थित होते.सुरूवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आली. प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील यांनी प्रास्ताविकात स्पर्धेच्या आयोजनामागील उद्देश, नियोजन व खेळाडूंना उपलब्ध करून दिलेल्या सुविधा यांची माहिती दिली. त्यांनी विद्यार्थिनींच्या सर्वांगीण विकासासाठी क्रीडास्पर्धांचे महत्त्व विषद केले. महापौर सौ. दीपमाला काळे यांनी आपल्या मनोगतात शालेय व महाविद्यालयीन जीवनातील क्रीडा स्पर्धाचे महत्त्व विशद करून खेळात प्रगतीचे आवाहन केले. डॉ. पराग पाटील व डॉ. वर्षा पाटील यांनी राज्यभरातून आलेल्या सर्व संघांचे, प्रशिक्षकांचे व व्यवस्थापकांचे स्वागत करून शुभेच्छा दिल्या. मुंबई, रायगड, नाशिक, पालघर, सोलापूर, सांगोला, चांदवड, चंद्रपूर, संगमनेर, सांगली, अंबड, जालना, इंदापूर, पुणे, अहिल्यानगर, लातूर महाराष्ट्रातील अ ते फ झोनमधील विविध जिल्ह्यांमधून संघ सहभागी झाले होते. कबड्डी व खो-खो दोन्ही स्पर्धांमध्ये अत्यंत चुरशीचे सामने रंगले.पारितोषिक वितरण सोहळास्पर्धेच्या समारोपप्रसंगी पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात पार पडला. विजेत्या व उपविजेत्या संघांना मान्यवरांच्या हस्ते चषक, पदके व प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली. प्रमुख पाहुण्यांनी सर्व खेळाडूंचे अभिनंदन करत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या व राज्य व राष्ट्रीय स्तरावर यश मिळविण्याचे आवाहन केले.जळगाव जिल्ह्यातील क्रीडाप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून खेळाडूंना उत्स्फूर्त प्रोत्साहन दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. नेहा चौधरी व प्रा. वैष्णवी नारखेडे यांनी केले. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी तंत्रनिकेतन समन्वयक प्रा. दीपक झांबरे, क्रीडा संचालक डॉ. जयंत जाधव, आयईडीएसएसए समन्वयक प्रा. दीपेश भुसे, सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी प्रतिनिधींनी विशेष परिश्रम घेतले.
कबड्डी स्पर्धेतील विजेते
कबड्डी स्पर्धेत शिवाजी पॉलिटेक्निक महाविद्यालय, सांगोला यांनी प्रथम क्रमांक पटकावला. तर शासकीय निवासी महिला पॉलिटेक्निक, तासगाव यांनी द्वितीय क्रमांक मिळविला.
खो-खो स्पर्धेतील विजेते
खो-खो स्पर्धेत श्री सिद्धेश्वर महिला पॉलिटेक्निक, सोलापूर यांनी प्रथम क्रमांक मिळविला, तर शासकीय निवासी महिला पॉलिटेक्निक, तासगाव यांनी उपविजेतेपद पटकावले.

 

 

Tags: #jalgaon godavari foundetion #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी बारी समाज विद्यालयात ‘घर घर दस्तक’ उपक्रम

Next Post

७८व्या वर्षीही चालण्याचा मिळविला नवा आत्मविश्वास!

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
७८व्या वर्षीही चालण्याचा मिळविला नवा आत्मविश्वास!

७८व्या वर्षीही चालण्याचा मिळविला नवा आत्मविश्वास!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

प्रसाधनगृह अस्वच्छ ठेवणाऱ्या  ठेकेदाराला तात्काळ नोटीस द्या,  प्रसंगी ठेका रद्द करा : महापौर दीपमाला काळे
1xbet russia

प्रसाधनगृह अस्वच्छ ठेवणाऱ्या  ठेकेदाराला तात्काळ नोटीस द्या,  प्रसंगी ठेका रद्द करा : महापौर दीपमाला काळे

April 1, 2026
जळगाव कचरा डेपो येथील रखडलेली कामे मार्गी लागणार
1xbet russia

जळगाव कचरा डेपो येथील रखडलेली कामे मार्गी लागणार

April 1, 2026
जळगाव महापालिकेच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा भावपूर्ण सन्मान
1xbet russia

जळगाव महापालिकेच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा भावपूर्ण सन्मान

April 1, 2026
पाईपने मारहाण करून ९ वर्षीय चिमुकल्याची हाडे केली फ्रॅक्चर
1xbet russia

पावणेदोन लाखांच्या रोकडसह सोन्या-चांदीचे दागिने लंपास

April 1, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

प्रसाधनगृह अस्वच्छ ठेवणाऱ्या  ठेकेदाराला तात्काळ नोटीस द्या,  प्रसंगी ठेका रद्द करा : महापौर दीपमाला काळे

प्रसाधनगृह अस्वच्छ ठेवणाऱ्या  ठेकेदाराला तात्काळ नोटीस द्या,  प्रसंगी ठेका रद्द करा : महापौर दीपमाला काळे

April 1, 2026
जळगाव कचरा डेपो येथील रखडलेली कामे मार्गी लागणार

जळगाव कचरा डेपो येथील रखडलेली कामे मार्गी लागणार

April 1, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon