निवडणुकीत विजयी करावे “मेस्टा” चे जिल्हाध्यक्ष नरेश चौधरीचे आवाहन

जळगाव – हुकूमशाही व भ्रष्टाचारी वृत्ती नष्ट करण्यासाठी पदवीधर मतदारांच्या न्यायासाठी संजयराव तायडे हे निवडणुकीत उभे आहेत. मराठवाडा पदवीधर मतदार संघामध्ये “मेस्टा” चे संस्थापक अध्यक्ष संजयराव विठ्ठलराव तायड़े हे सक्षम पर्याय म्हणून पदवीधारक मतदारांसाठी निवडणूक लढवीत आहेत.
संजयराव तायड़े यांनी पदवीधर मतदारांसाठी एक वचननामा जाहीर केला आहे. केवळ आश्वासन नव्हे तर कृती करणार हा शब्द त्यांनी वचननामा मधून दिला आहे. पदवीधर आमदारांच्या यापूर्वीच्या निराशाजनक अनुभवानंतर आता खऱ्या अर्थाने “महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टीज असोसिएशन” चे संस्थापक अध्यक्ष आणि सामाजिक चळवळीतील कार्यकर्ते असलेले संजयराव
विठ्ठलराव तायड़े हे पदवीधरांच्या हक्कासाठी मराठवाडा पदवीधर मतदार संघातून निवडणूक लढवीत आहे. मतदार नागरिकांनी आपल्या मताचा आदर ठेवावा. विवेकबुद्धीचा वापर करून मतदान करावे. तसेच मराठवाडा पदवीधर मतदार संघात बदल घडवून आणावे असे आवाहन संजयराव विठ्ठलराव तायड़े (अपक्ष उमेदवार) यांनी केले आहे.
वचननाम्यामध्ये त्यांनी अनेक संकल्प केले आहेत. आरटीईचा फी परतावा ऑनलाईन खात्यावर विनाविलंब जमा केला जाईल. शाळांसाठी स्वतंत्र संरक्षण कायदा लागू करण्यासाठी पर्यंत करण्यात येईल. शैक्षणिक संस्थांची मालमत्ता रद्द करण्यासाठी प्रयत्न केले जाईल. पदवीधर बेरोजगारांना उद्योग उभारण्यासाठी मदत करण्यासाठी शासन दरबारी प्रयत्न करणार. शेतकऱ्यांसाठी शेती पूरक व्यवसाय निर्माण करणार. वकिलांसाठी पेन्शन योजना लागू केली जाणार. शिकाऊ वकिलांसाठी मानधन उपलब्ध करून दिले जाईल. वकील, डॉक्टर यांना व्यवसायासाठी बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून दिले जाईल. विनाअनुदानित शाळांचे आणि शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी कटिबद्ध राहील. पदवीधर व्यवसायिकांना व्यवसायवृद्धीसाठी राष्ट्रीयकृत बँकांकडून बिनव्याजी कर्ज मिळवून देण्यासाठी कृतिशील राहील. पदवीधारकांना शिक्षण मित्र म्हणून मानधन मिळवून देणार. नोंदणी केलेल्या बेरोजगार पदवीधर युवकास मासिक भत्ता १० हजार रुपये प्रमाणे मंजूर करण्यासाठी प्रयत्न केले जाईल. अशा विविध बाबी संजयराव विठ्ठलराव तायडे यांनी वचननाम्यामध्ये मांडल्या आहेत. संजयराव विठ्ठलराव तायड़े हे अपक्ष उमेदवार आहेत.
त्यांना या मराठवाडा पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत विजयी करावे असे आवाहन “मेस्टा” चे जिल्हाध्यक्ष व अभियंता नरेश चौधरी यांच्यातर्फे करण्यात आले आहे.







