एकाच दिवशी शंभरांवर रुग्णांची होणार चाचणी
जळगाव ;- सध्या कोरोनाचे संकट जगावर घोंगावत असताना आता कोरोनाची चाचणी अहवाल जळगावात उपलब्ध होणार असून सुमारे शंभरांवर अधिक व्यक्तींचे चाचणी याद्वारे होणार असल्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केसरीराजशी बोलतांना सांगितले . तसेच यासाठी २ कोटी रुपयांचा निधी जिल्हा नियोजन निधीतून उभारण्यात आला असून २४ तास तीन शिफ्टमध्ये या प्रयोगशाळेत काम चालणार असून यामुळे अवघ्या काही तासांमध्ये कोरोना रुग्णांचा रिपोर्ट हा पॉझिटिव्ह कि निगेटिव्ह हे लवकर कळणार असल्याने वेळेचीही बचत होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली .
जळगाव येथून स्वाबचे नमुने औरंगाबाद ,पुणे , नागपूर आणि धुळे येथे देण्यात येत असल्याने कोरोना संशयितांचा अहवाल प्राप्त होण्यास किमान २४ तासांचा विलंब लागत असल्याने नेमकी कोरोना ग्रस्त आणि निगेटिव्ह रुग्णाची माहिती मिळण्यास विलंब लागत होता . मात्र आता पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या प्रयत्नातून उभारण्यात आलेल्या जळगावातील कोरोना प्रयोग शाळेच्या माध्यमातून त्वरित बाधित रुग्नांची माहिती प्राप्त होण्यास मदत होणार आहे .दरम्यान आतापर्यंत दोन दिवसात दोनशेवर रुग्णांची चाचणी करण्यात आली आहे . २३ मे पासून प्रयोगशाळा सुरु झाली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे .