• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जि.प. अधिकाऱ्यांनी तृतीय क्रमांकाचा पुरस्कार ऑनलाईन स्वीकारला

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 2, 2020
in जळगाव
0

सामुदायिक शौचालय अभियानात उत्कृष्ट कामगिरी

जळगाव (प्रतिनिधी) – सामुदायीक शौचालय अभियान स्पर्धेत देशपातळीवर तृतीय क्रमांकाचा मानकरी जळगाव जिल्हा ठरला. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५१व्या जयंतीचे औचित्य साधून आज २ ऑक्टोबर रोजी व्हर्च्युअल कार्यक्रमाद्वारे केंद्र सरकारच्या जल शक्ती मंत्रालयाच्या वतीने जिल्ह्याचा गौरव करण्यात आला. केंद्रीय जल शक्ती मंत्री गजेंद्रसिंह शेखावत आणि राज्यमंत्री रतनलाल कटारीया यांनी प्रशस्ती पत्र आणि मानचिन्ह देऊन जिल्ह्याचा ऑनलाईन सन्मान केला.
जिल्हा परीषदेच्या अध्यक्षा रंजना पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी बी.एन.पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी दि.रा.लोखंडे आदींनी ऑनलाईन पुरस्कार स्विकारला. या राष्ट्रीय पुरस्काराने जळगाव जिल्ह्याचा स्वच्छतेच्या कार्यात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
जिल्हाधिकारी कार्यालय सभागृहात पार पडलेल्या व्हर्चुअल पुरस्कार वितरण कार्यक्रमाला कनिष्ठ प्रशासन अधिकारी ऋषीकेश भदाणे, जलनिरीक्षक दिपक राजपूत,संवादतज्ञ निलेश रायपूरकर आदींची उपस्थिती होती. केंद्र सरकारच्या जलशक्ती मंत्रालयाच्या पेयजल व स्वच्छता विभागाने सार्वजनिक शौचालयाचे बांधकाम, सौंदर्यीकरण व देखभाल व्यवस्था या बाबींना प्रोत्साहीत करण्यासाठी सामुदायीक शौचालय अभियान स्पर्धा आयोजित केली होती. ग्रामीण भागात शौचालयाचा नियमित उपयोग वाढविणे, गावस्तरावर स्वच्छता साधनांविषयीची स्वमालकीची भावना वाढविणे आणि सार्वजनिक शौचालयाचे बांधकाम होऊन त्याची देखभाल होण्याच्या उद्देशाने १५ जून ते १५ सप्टेंबर या तीन महीन्याच्या कालावधीत ही स्पर्धा घेतली होती. केंद्र सरकारच्या जल शक्ती मंत्रालयाच्या पेयजल व स्वच्छता विभागाने घोषीत केलेल्या सामुदायीक शौचालय अभियान स्पर्धेत देशात तृतीय क्रमांक जिल्ह्याने पटकाविला.
शुक्रवारी २ ऑक्टोबरला राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे जयंतीचे औचित्य साधून स्वच्छता दिवस म्हणून देशभरातील विविध पुरस्कारासाठी पात्र ठरलेल्या जिल्हा व ग्राम पंचायतींचा गौरव करण्यात आला. वितरण कार्यक्रमात केंद्र स्तरावर जल शक्ती मंत्रालयाचे सचिव यु. पी. सिंग, अपर सचिव अरूण बारोका यांची उपस्थिती होती.


 

 

Previous Post

दोन उपअधिष्ठात्यांसह वैद्यकीय अधिक्षक कोविड रूग्णालयात रूजू

Next Post

चोपडा नगरपरिषदेच्या घनकचरा व्यवस्थापन कामांचा शुभारंभ

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

चोपडा नगरपरिषदेच्या घनकचरा व्यवस्थापन कामांचा शुभारंभ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महिला हरिनाम सप्ताहात जाताच चोरट्यांची घरफोडी ; ३ लाखाचा मुद्देमाल लांबवला
1xbet russia

 पाचोर्‍यात घरफोडी; रोख रकमेसह सोन्या-चांदीचे दागिने लंपास

May 14, 2026
अरे बापरे ! पाळीव कुत्र्याच्या हल्ल्यात ९ वर्षांच्या बालकाचा मृत्यू
1xbet russia

अरे बापरे ! पाळीव कुत्र्याच्या हल्ल्यात ९ वर्षांच्या बालकाचा मृत्यू

May 14, 2026
उत्‍तर महाराष्ट्रात एकमेव गोदावरी पॉलिटेक्निक मध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स व मशीन लर्निंग अभ्यासक्रमासाठी परवानगी
1xbet russia

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात १४ मे ‘गोदावरी हॅकॅथॉन १.०’चा जल्लोष,

May 14, 2026
डॉ. उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालय रूग्णालय येथे आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन उत्साहात साजरा
1xbet russia

डॉ. उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालय रूग्णालय येथे आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन उत्साहात साजरा

May 14, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

महिला हरिनाम सप्ताहात जाताच चोरट्यांची घरफोडी ; ३ लाखाचा मुद्देमाल लांबवला

 पाचोर्‍यात घरफोडी; रोख रकमेसह सोन्या-चांदीचे दागिने लंपास

May 14, 2026
अरे बापरे ! पाळीव कुत्र्याच्या हल्ल्यात ९ वर्षांच्या बालकाचा मृत्यू

अरे बापरे ! पाळीव कुत्र्याच्या हल्ल्यात ९ वर्षांच्या बालकाचा मृत्यू

May 14, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon