• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

जिल्ह्यात शाळा प्रवेशोत्सव उत्साहात होणार साजरा

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 15, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
जिल्ह्यात शाळा प्रवेशोत्सव उत्साहात होणार साजरा

मंत्र्यांसह अधिकारी देणार विद्यालयात भेट

जळगाव (प्रतिनिधी) :- राज्यातील सर्व शाळांमध्ये १६ जून २०२५ पासून शैक्षणिक वर्षाला प्रारंभ होत असून, त्यानिमित्ताने “शाळा प्रवेशोत्सव २०२५-२६” हा उपक्रम संपूर्ण राज्यभर उत्साहात, प्रेरणादायी वातावरणात साजरा करण्यात येणार आहे. या उपक्रमाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे, राज्याचे सर्व मंत्री, लोकप्रतिनिधी, अधिकारी, शाळेत जाऊन प्रवेशोत्सव साजरा करणार आहेत. जळगाव जिल्ह्यातील सर्व शाळा प्रवेशोत्सावासाठी सज्ज आहेत.

जिल्ह्यातील सर्व अधिकाऱ्यांनी कोणत्या शाळेत जावे या संदर्भातील लेखी सूचना जिल्हाधिकारी यांनी काढल्या आहेत.या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील सर्व शासकीय अधिकारी, शिक्षक, मुख्याध्यापक आणि संबंधित विभागांनी सहभाग घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.जिल्ह्यातील सर्व अधिकाऱ्यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील किमान एका शासकीय किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळेस भेट देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिले आहेत. शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे रांगोळी, तोरण, पुष्पवर्षाव, गुलाबपुष्प वितरण आदींनी स्वागत करण्यात यावे.गणवेश आणि मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण शाळेच्या पहिल्या दिवशी होणार असून, या वितरणास संबंधित अधिकाऱ्यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांचा उत्साह द्विगुणित करावा.

शाळाबाह्य विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण पूर्ण करणे आणि सर्व पात्र मुलांना शाळेत प्रवेश देण्यात आला आहे याची खातरजमा करणे अपेक्षित आहे.कोणताही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देश आहेत. जे अधिकारी शाळेत जातील त्या अधिकाऱ्यांनी वर्गखोल्या, स्वच्छता, पिण्याचे पाणी, प्रयोगशाळा, पोषण आहार, क्रीडांगण आदींचा आढावा घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांना स्वच्छता, वाचन, सांस्कृतिक उपक्रम, खेळ, आणि शैक्षणिक प्रगतीबाबत प्रेरित करावे.महिला बचत गट, युवक मंडळे, स्थानिक संस्था, पालक, आणि शाळा व्यवस्थापन समित्यांचा सक्रीय सहभाग घेण्याच्या सूचना सर्व शाळांना दिल्या आहेत. दि. १२ ते १४ जून २०२५ दरम्यान शाळांचे स्वच्छता आणि सुशोभीकरण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जिल्हा परिषद, समाजकल्याण, आदिवासी विकास, नगरपरिषद यांच्याकडील आश्रमशाळांना विशेष भेटी देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. “शाळा हे ज्ञानाचं मंदिर आहे; पहिल्या दिवशी स्वागत हा नव्या वाटचालीचा आरंभ असतो,” असे म्हणत शासनाने या उपक्रमासाठी सर्वांना सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. शिक्षणाची गंगा घराघरांत पोहोचवण्याचा संकल्प या प्रवेशोत्सवाच्या माध्यमातून दृढ करण्यात येणार आहे.

मंत्री, अधिकारी राहणार शाळांमध्ये उपस्थित
रक्षा खडसे, केंद्रीय राज्यमंत्री = जिल्हा परिषद शाळा कोथळी ता. मुक्ताईनगर
गिरीश महाजन, मंत्री जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन =जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जामनेर क्रमांक १
गुलाबराव पाटील, पालकमंत्री तथा पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री =जिल्हा परिषद मुलांची शाळा पाळधी ता. धरणगाव
संजय सावकारे, वस्त्रोद्योग मंत्री =जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मोंढाळे ता. भुसावळ
आयुष प्रसाद, जिल्हाधिकारी =जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळा पिलखेडे ता. जळगाव
मीनल करनवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी =जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नांद्रा बुद्रुक ता. जळगाव
डॉ. महेश्वर रेड्डी, पोलीस अधीक्षक =जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिलखेडे ता. जळगाव*


 

Tags: #jalgaon news #maharashtra #bharat
Previous Post

शिरसोली येथे मुख्यमंत्री सामुदायिक आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

Next Post

वृध्दाचे बंद घर फोडून रोकडसह सोन्याचे दागिने लांबविले !

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
बंद घर फोडून दागिन्यांसह रक्कम लांबविली

वृध्दाचे बंद घर फोडून रोकडसह सोन्याचे दागिने लांबविले !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

संगीताची मैफल: ‘मृगस्वर’ कार्यक्रमाने रसिकांची मने जिंकली!  
Uncategorized

संगीताची मैफल: ‘मृगस्वर’ कार्यक्रमाने रसिकांची मने जिंकली!  

June 15, 2025
खिर्डी खुर्द विद्या विकास मंडळाच्या निवडणुकीत सरस्वती पॅनल विजयी
1xbet russia

खिर्डी खुर्द विद्या विकास मंडळाच्या निवडणुकीत सरस्वती पॅनल विजयी

June 15, 2025
ग्रामसेवक संघटनेचे रावेर तालुका अध्यक्ष, सचिवाविरुद्ध ग्रामसेविकेची फिर्याद
1xbet russia

बसस्थानकात पर्स लांबविणाऱ्या संशयित महिलेची कोठडीत रवानगी

June 15, 2025
घरांवर वीज कोसळली, वाहनांसह वस्तूंचे नुकसान
1xbet russia

शेतीकाम करताना वीज कोसळली, बालकासह ३ ठार, १ जखमी

June 15, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

संगीताची मैफल: ‘मृगस्वर’ कार्यक्रमाने रसिकांची मने जिंकली!  

संगीताची मैफल: ‘मृगस्वर’ कार्यक्रमाने रसिकांची मने जिंकली!  

June 15, 2025
खिर्डी खुर्द विद्या विकास मंडळाच्या निवडणुकीत सरस्वती पॅनल विजयी

खिर्डी खुर्द विद्या विकास मंडळाच्या निवडणुकीत सरस्वती पॅनल विजयी

June 15, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon