जळगाव ( प्रतिनिधी ) – जिल्ह्यातील कोरोना रूग्णांची संख्या पुन्हा आटोक्यात येत असली तरी आज दोन रूग्ण आढळून आले
आज सायंकाळी जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार गेल्या चोवीस तासांमध्ये जिल्ह्यात दोन नवीन कोरोना रूग्ण आढळून आले आहे. गेल्या आठवड्यातसुध्दा एका दिवशी व कालसुध्दा एक रूग्ण आढळून आला होता. आज दोन पेशंट आढळून आले आहे. एक रूग्ण भुसावळात तर दुसरा धरणगावात आढळून आला आहे. कोरोनामुळे आज कुणाचाही मृत्यू झालेला नाही.
जिल्ह्यात गत चोवीस तासांमध्ये एकाही रूग्णाने कोरोनावर मात केली नाही. जिल्ह्यात आता कोरोना लसीकरणाला देखील वेग आला आहे. जिल्ह्यात सध्या ३० सक्रीय कोरोना रूग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.