जळगाव (प्रतिनिधी) :- जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष जिल्हा परिषद जळगाव, अंतर्गत जलजीवन मिशनची व्यापक प्रमाणात जनजागृती व्हावी यासाठी जिल्हास्तरीय लघुपट निर्मिती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेत सहभागी होण्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांनी आवाहन केले आहे.
या स्पर्धेत सहभागी स्पर्धकांनी लघुपटाची निर्मिती ही स्वतः केलेली असावी.पटकथा,दृश्य,संकल्पना,संवाद,पार्श्वसंगीत,गीत,चित्रीकरण हे स्वतः तयार केलेले असावे.अगोदर प्रकाशित झालेले किंवा व्यक्ती,संस्था,कंपनी,शासकीय विभाग यांनी त्यांच्या कामासाठी तयार केलेले लघुपट या स्पर्धेसाठी सादर करण्यात येऊ नये. या स्पर्धेसाठी सादर करण्यात येणारे लघुपट याबाबतचे कॉपी राईट बाबतचे उल्लंघन होत नसल्याचे स्वयंघोषित प्रमाणपत्र प्रत्येक स्पर्धकाकडून घेण्यात येतील. लघुपट निर्मितीसाठी वापरण्यात आलेले शुटींग साहित्य व्यावसायिक दर्जाचे व उत्तम असावे. लघुपट निर्मितीसाठीच्या भाषेचा वापर हा प्रमाण मराठी व कोणाच्याही भावना व अस्मिता दुखावणारे नसावे.या स्पर्धेसाठी जमा झालेले लघुपट स्पर्धेसाठी पात्र व निवडीचे अधिकार प्रकल्प संचालक,जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन,जिल्हा परिषद यांच्याकडे असतील.
लघुपटाचे विषय पाण्याचे शाश्वत स्त्रोत, पाणी पुरवठा देखभाल दुरुस्ती, जलसंवर्धन, हर घर जल घोषित गाव विकास, जलजीवन मिशन यशोगाथा, विविध योजनांचे कृतीसंगम या विषयावर लघुपट तयार करणे अपेक्षित आहे. लघुपट स्पर्धेसाठी एक सहभागी स्पर्धक एकाच विषयावरील लघुपट सादर करू शकतील.स्पर्धक हा जळगाव जिल्ह्यातीलच असावा.या स्पर्धेसाठी ३ ते ५ मिनिटाची लघुपट निर्मिती असणे आवश्यक आहे. सदर लघुपट दिनांक २३ फेब्रुवारी २०२४ पर्यंत जिल्हा पाणी स्वच्छता मिशन,जिल्हा परिषद,जळगाव येथे SoftCopy स्वरूपात अथवा sbmzpjalgaon@gmail.com या मेल आयडीवर पाठवावे.
यथावकाश विजेत्या स्पर्धकांची नावे व बक्षीस वितरण कार्यक्रम घोषित करण्यात येतील. स्पर्धेबाबत सर्व अधिकार मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद,यांनी राखून ठेवले असून स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी अंकीत व प्रकल्प संचालक,पाणी व स्वच्छता भरत कोसोदे यांनी केले आहे.